सिंधूला मोठा धक्का, वर्ल्ड चॅम्पियन करणाऱ्या प्रशिक्षकानं सोडली साथ

सिंधूला मोठा धक्का, वर्ल्ड चॅम्पियन करणाऱ्या प्रशिक्षकानं सोडली साथ

पीव्ही सिंधूची प्रशिक्षक किम जी ह्यून हिने राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणामुळे किमने घेतलेल्या या निर्णयानं पुलेला गोपिचंद यांच्यावर जबाबदारी वाढली आहे.

  • Share this:

हैदराबाद, 24 सप्टेंबर : वर्ल्ड चॅम्पियन आणि भारताची स्टार बॅडमिंटन खेळाडू पीव्ही सिंधूला मोठा धक्का बसला आहे. भारतीय एकेरी बॅडमिंटन प्रशिक्षक किम जी ह्यून हीने प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणामुळे तिनं राजीनामा दिल्याचं बोललं जात आहे. दक्षिण कोरियाची असलेली किम गेल्या चार महिन्यांपासून सिंधूसोबत आहे.

सिंधूला वर्ल्ड चॅम्पियन करण्यात किमने महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र काही आठवड्यापूर्वी तिच्या पतीची तब्येत बिघडली. त्यामुळे किमला न्यूझीलंडला परतावं लागलं होतं.

टाइम्स ऑफ इंडियने दिलेल्या वृत्तानुसार किमच्या पतीला सहा महिन्यांची विश्रांती घ्यावी लागणार आहे. या काळात त्याची देखभाल करण्याची गरज आहे. तसेच सर्जरीसुद्धा करावी लागू शकते. अशा परिस्थितीत कुटुंबाला किमची उपस्थिती गरजेची असेल. किमने म्हटलं की तिला परत येणं शक्य नसल्याचं सांगितलं आहे.

किमच्या या निर्णयामुळे पुलेला गोपीचंद यांच्यावर कामाचा भार वाढणार आहे. किम असल्यानं गोपीचंद यांना इतर बाबींवर बारकाईनं अभ्यास करता येत होता. यातच आता ऑलिम्पिकसाठी जास्त वेळ उरलेला नाही. त्यामुळे बॅडमिंटन असोसिएशनसमोर किमच्या जागी दुसऱ्या प्रशिक्षकाची निवड करण्याचं आव्हान आहे.

पुलेला गोपिचंद यांनी प्रशिक्षकांची कमतरता असल्याचं मत वर्ल्ड चॅम्पियनशिपनंतर व्यक्त केलं होतं. भारताकडे प्रतिभावान खेळाडू भरपूर आहेत. त्यांना योग्य मार्गदर्शकाची गरज असून ती पुरवली नाही तर ही प्रतिभा घडवण्यासाठी प्रशिक्षकांची कुमक कमी पडत आहे. यामुळं पुलेला गोपिचंद यांची चिंता वाढली आहे.

सध्या पीव्ही सिंधूचे संपूर्ण लक्ष कोरिया ओपनवर आहे. वर्ल्ड चॅम्पियन झाल्यानंतर तिला चायना ओपनमध्ये पराभव पत्करावा लागला होता. हा पराभव विसरून विजेतेपद पटकावण्यावर तिचं लक्ष असेल. पहिल्या फेरीत सिंधूचा सामना अमेरिकेच्या बीवन झांग हिच्याशी होणार आहे. दोघींमध्ये झालेल्या आठ सामन्यात तिने पाचवेळा झांगला पराभूत केलं आहे.

कॅप्टन कोहली मैदानावरचा राडा पडला महागात, ICCने केली मोठी कारवाई

VIDEO : हेल्मेट घालून केली चोरी; विदेशी दारूसह 50000 लुटतानाची दृश्य CCTV मध्ये कैद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 24, 2019 09:51 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading