भारताच्या महिला क्रिकेटरकडून मॅच फिक्सिंगचा प्रयत्न, दोघांविरोधात तक्रार दाखल

भारताच्या महिला क्रिकेटरकडून मॅच फिक्सिंगचा प्रयत्न, दोघांविरोधात तक्रार दाखल

भारतीय महिला क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर असताना एका सामन्याच्या फिक्सिंगसाठी पैशांची ऑफर दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 सप्टेंबर : टीएनपीएलमध्ये मॅच फिक्सिंगची शक्यता असल्याचा प्रकार समोर आल्यानंतर आता भारतीय महिला क्रिकेट विश्वात खळबळ उडवणारी बातमी आली आहे. बीसीसीआयच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडून दोन लोकांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. राकेश बाफना आणि जितेंद्र कोठारी यांच्याविरुद्ध मॅच फिक्सिंग आणि फसवणूक केल्याबद्दल एफआयआर (FIR)दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बाफनाने भारताच्या राष्ट्रीय महिला संघातील एका सदस्याला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. तसेच या क्रिकेटरला मॅच फिक्सिंग मोठी रक्कम देण्याचं आमिष दाखवलं. हा प्रकार फेब्रुवारीमध्ये झाला होता. त्यावेळी इंग्लंडविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिकेची तयारी महिला संघ करत होता. ही मालिका आयसीसीच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपचा भाग होती.

अँटी करप्शन युनिटचे प्रमुख अजित सिंह यांनी सांगितलं की, दोन लोकांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. महिला क्रिकेटरनं बीसीसीआय़ला संपूर्ण माहिती दिली आहे. याशिवाय एका आरोपीशी झालेलं संभाषणाचं रेकॉर्डिंगही महिला क्रिकेटरनं दिलं आहे.

ज्या दोघांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे त्यापैकी कोठारी इन्स्टाग्रामवरून महिला क्रिकेटरच्या संपर्कात आला होता. त्याने महिला क्रिकेटरला व्यवस्थापक म्हणून काम करण्याबद्दलही सांगितलं. तसा प्रस्तावही दिला पण त्या करारावर महिला क्रिकेटरनं सही केली नाही. त्यानंतर कोठीरीने बाफनाच्या मदतीनं मॅच फिक्सिंगसाठी महिला क्रिकेटरशी संपर्क केला. ओडिसात राहणाऱ्या बाफनाने भारत इंग्लंड यांच्यातील एक सामना फिक्स करण्यासाठी महिला क्रिकेटरला 1 लाख रुपये देण्याची ऑफर दिली होती.

बाफनाने फक्त महिला क्रिकेटपटूला मॅच फिक्सिंगमध्ये ओढण्याचा प्रयत्न केला नाहीतर संघाची कर्णधाराशी देखील संपर्क करण्याचा डाव होता. जेव्हा महिला क्रिकेटरला यात काहीतरी चुकीचं होत आहे याचा संशय आला तेव्हा एसीयूला संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली.

Loading...

हेल्मेटचा जुगाड: हेल्मेट म्हणून चक्क डोक्यावर ठेवलं स्टीलचं पातेलं VIRAL VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Sep 17, 2019 09:36 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...