भारताचा श्रीलंकेवर दणदणीत विजय;2-1ने मालिका केली काबीज

आज विशाखापट्टणमचच्या सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी आणि फलंदाजांनी शानदार कामगिरी करत सामना खिशात घातला. सामन्यात भारताने आज नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Dec 17, 2017 08:21 PM IST

भारताचा श्रीलंकेवर दणदणीत विजय;2-1ने मालिका केली काबीज

विशाखापट्टणम,17 डिसेंबर: भारत-श्रीलंकामध्ये झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेवर भारताने दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयासह ही एकदिवसीय मालिकाही भारताने काबीज केली आहे.

आज विशाखापट्टणमचच्या सामन्यात भारताच्या गोलंदाजांनी आणि फलंदाजांनी शानदार कामगिरी करत सामना खिशात घातला. सामन्यात भारताने आज नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेची सुरूवात शानदार झाली. समरविजय आणि उप्पूल थरंगांनी तब्ब्ल 121 धावांची पार्टनरशिप केली.पण ही पार्टनरशीप   कुलदीप यादवने तोडली. कुलदीपने थरंगाची तर यजुवेंद्र चहलने समरविजयची विकेट घेतली. यानंतर श्रीलंकेचा डाव  अवघ्या 215  धावांवर गुंडाळण्यात भारतीय गोलंदाजांनी यश मिळवलं.कुलदीप यादवने 3 ,यजुवेंद्रने 3 तर हार्दिक पांड्यने 2 विकेट घेतल्या. श्रीलंकेचा स्कोर सर्वबाद 215 असा झाला.

त्यानंतर आज सामन्यात शिखर धवनच्या  जोरदार शतकाच्या जोरावरती भारताने हा सामना खिशात घातला. श्रेयस अय्यर आणि शिखर धवनने 100  धावांहून अधिक धावांची   पार्टनरशिप केली. श्रेयस अय्यर आऊट झाला तेव्हा भारताचा स्कोअर 149-2 इतका झाला.त्यानंतर शिखर धवनने सुरेख खेळी करत आपले शतक पूर्ण केलं. अवघ्या 32 षटकांमध्ये 2बाद 219चा स्कोअर करत भारताने हा सामना जिंकला. गेल्या मॅचमध्ये द्विशतकी खेळी करणाऱ्या रोहित शर्माला मात्र या सामन्यात काही आपली छाप पाडता आली नाही.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 17, 2017 08:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...