CWG2018: भारतासाठी सुपर सॅटर्डे; आठ सुवर्ण पदकांची कमाई

CWG2018: भारतासाठी सुपर सॅटर्डे; आठ सुवर्ण पदकांची कमाई

बॉक्सिंगमध्ये भारताच्या मेरी कोम आणि गौरव सोळंकीनं उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावलंय

  • Share this:

14 एप्रिल:  राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय क्रीडापटूंकडून पदकांची लयलूट सुरुच आहे. आजचा दिवस हा भारतासाठी सुवर्ण दिवस ठरलाय. आज एकुण आठ सुवर्णपदकांची कमाई भारतीय खेळाडूंनी केलीय.

बॉक्सिंगमध्ये भारताच्या मेरी कोम आणि गौरव सोळंकीनं उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावलंय. तर नेमबाजीत संजीव राजपूतनं आणि भालाफेकीत नीरज चोप्रानं सुवर्णपदकावर नाव कोरलं. कुस्तीमध्ये सुमित मलिक आणि विनेश फोगाटनं देखील सुवर्णपदक पटकावलं. या सुवर्ण षटकारानंतर, टेबल टेनिसपटू मनिका बत्रानं भारताला आजच्या दिवसाचं सातवं सुवर्णपदक मिळवून दिलंय. आजच्या सुवर्ण कामगिरीसह भारताची पदक संख्या 59वर पोहोचलीय. यामध्ये 25 सुवर्ण, 16 रौप्य तर 18 कांस्य पदकांचा समावेश आहे.

आज मिळालेली सुवर्णपदके 

बॉक्सिंग - मेरी कोम, विकास कृष्णन आणि गौरव सोळंकी

नेमबाजी - संजीव राजपूत

भालाफेक - नीरज चोप्रा

कुस्ती - सुमित मलिक आणि विनेश फोगाट

टेबल टेनिस - मनिका बत्रा

First published: April 14, 2018, 7:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading