टोकियो, 21 ऑगस्ट : भारताच्या पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिक टेस्ट टूर्नामेंटच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडला पराभूत केलं. अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडवर 5-0 अशा गोल फरकाने विजय मिळवला. भारताने सामन्यात सुरुवातीपासून वर्चस्व राखलं. या विजयासह न्यूझीलंडकडून राउंड रॉबिन फेरीत पत्कराव्या लागलेल्या पराभवाची भारताने परतफेड केली.
भारताचा कर्णधार हरमनप्रीत सिंहने सातव्या मिनिटाला पहिलं यश मिळवून दिलं. त्याने पहिला गोल केल्यानंतर दुसरा गोल शमशेर सिंहनं 18 व्या मिनिटाला, नीलाकांता शर्माने 22 व्या मिनिटाला गोल केला. त्यानंतर गुरसाहिबजीत सिंगने 26 व्या तर मनदीप सिंगने 27 व्या मिनिटाला गोल केला.
भारताने पहिल्या क्वार्टरमध्ये 1-0 ने आघाडी घेतली होती. पहिल्यापासूनच चेंडूवर नियंत्रण ठेवण्यात भारतीय संघ यशस्वी ठरला. न्यूझीलंडला दुसऱ्या क्वार्टरमध्ये दोनवेळा सर्कलमध्ये चढाईचा प्रयत्न केला. दरम्यान भारताने तीन गोल केले होते. शेवटच्या क्वार्टरमध्ये भारताच्या बचावफळीने न्यूझीलंडला एकही संधी दिली नाही.
Make way for the WINNERS!!
— Hockey India (@TheHockeyIndia) August 21, 2019
FIH Series Finals: ✔
Olympic Test Event: ✔
Next : Olympic Qualifier #IndiaKaGame #ReadySteadyTokyo #Tokyo2020 @WeAreTeamIndia pic.twitter.com/FFToOT0ijj
एफआयएच ऑलिम्पिक क्वालिफायर विजेत्याला 2020 मध्ये होणाऱ्या टोक्यो ऑलिम्पिकचं तिकीट मिळणार आहे. ही क्वालिफायर स्पर्धा 2019 च्या शेवटी नोव्हेंबरमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. त्यापूर्वी हॉकी संघांना ऑलिम्पिक टेस्ट टुर्नामेंट खेळावी लागते.
दरम्यान, भारताच्या पुरुष हॉकी संघाने टेस्ट टुर्नामेंट जिंकली असून महिला संघसुद्धा फायनलमध्ये पोहचला आहे. भारतीय महिला हॉकी संघानं मंगळवारी चीनविरुद्धचा सामना बरोबरीत सुटला. यासह भारतानं फायनल गाठली आहे. त्याआधी भारतीय महिला हॉकी संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध जबरदस्त कामगिरी केली होती.
राज ठाकरेंच्या मदतीला दादूस आला धावून, पाहा काय म्हणाले उद्धव ठाकरे...