Under 19 Asia Cup : भारत आणि पाकिस्तान यांच्यात कांटे की टक्कर! 'या' तारखेला होणार महामुकाबला

Under 19 Asia Cup : भारत आणि पाकिस्तान यांच्यात कांटे की टक्कर! 'या' तारखेला होणार महामुकाबला

वर्ल्ड कपनंतर आता पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला होणार आहे.

  • Share this:

कोलंबो, 05 सप्टेंबर : भारत आणि पाकिस्तान यांच्यात नेहमीच रंगदार लढत होत असते. या दोन्ही देशांमध्ये क्रिकेटचे सामने म्हटले की युध्दजन्य परिस्थिती निर्माण होते. दरम्यान वर्ल्ड कपनंतर आता पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला होणार आहे. हा सामना श्रीलंकेत आजपासून सुरू होणाऱ्या अंडर-19 आशियाई चषकात होणार आहे. अंडर-19मध्ये आशियाई चषकात पहिले दोन सामने हे भारत विरुद्ध कुवैत यांच्यात तर दुसरा सामना पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यात होणार आहे.

आशियाई कपमध्ये सर्वात यशस्वी असललेल्या भारतीय संघाला यंदाही आशियाई कपचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. 1989मध्ये सुरू झालेल्या आशियाई चषकात आतापर्यंत 6 वेळा भारतीय संघ चॅम्पियन बनली आहे. तर, 2012मध्ये भारत आणि पाकिस्तान यांना चषक विभागून देण्यात आला होता.

दरम्यान, या स्पर्धेतील सर्वात रोमांचक सामना हा 7 सप्टेंबर, शनिवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळवला जाणार आहे. या सामन्यात अंडर-19 संघाचे कर्णधारपद युवा ध्रुव जुरेल याच्याकडे देण्यात आले आहे.

वाचा-'या' कारणामुळे अजूनही विराटपेक्षा धोनीच वरचढ, दिग्गज क्रिकेटपटूनं व्यक्त केलं मत

यंदाच्या आशियाई चषकमध्ये एकूण 8 संघा सामिल झाले आहे. यात श्रीलंका, भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, कुवैत, बांगलादेश, नेपाळ आणि युएई या संघांचा समावेश आहे. यात दोन्ही संघांना अ आणि ब अशा दोन गटात विभागणी केली होती. महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारत आणि पाकिस्तान यांना एकाच गटात ठेवण्यात आले आहे.

भारताच्या गटात पाकिस्तान शिवाय अफगाणिस्तान आणि कुवैत या दोन संघाचा समावेश आहे. तर ग्रुप बीमध्ये श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ आणि युएई या संघाचा समावेश आहे. अंडर-19 युथ आशियाई चषकाची अंतिम सामना 14 सप्टेंबरला कोलंबोच्या प्रेमदासा मैदानावर होणार आहे.

वाचा-अखेरच्या मॅचमध्ये टीम इंडियाला जिंकवलं अन् सचिनसोबतच संपलं ‘या’ गोलंदाजाचं करिअर

कारगिल युध्द जिंकलेल्या हिरोचा मुलगा असणार संघाचा कर्णधार

कारगिल युध्दात भारतासाठी सीमेवर ज्यांनी शत्रुशी दोन हात केले. त्याच भारतीय लष्करातील जवानामुळं पाकिस्तानला गुडगे टेकावे लागले, आता त्याच जवानाचा मुलगा भारताचा झेंडा अटकेपार रोवण्यास सज्ज आहे. मात्र, हा मुलगा सीमेवर युध्द नाही तर क्रिकेटमध्ये भारतीय संघाला आशियाई चषकात विजय मिळून देण्यास सज्ज आहे. हा खेळाडू आहे, ध्रुव जुरेल. ध्रुव भारतीय अंडर-19 संघाकडून युवा आशियाई चषक खेळणार आहे. ध्रुवकडे भारतीय संघाचे कर्णधारपदही देण्यात आले आहे. त्यामुळं सप्टेंबरमध्ये श्रीलंकेत होणाऱ्या या स्पर्धेत विजय मिळवण्यासाठी ध्रुव सज्ज आहे. दरम्यान, ध्रुवचे वडिल 1999मध्ये झालेल्या कारगिर युध्दात लढले होते. आग्रा येथे स्थायिक असलेला ध्रुव त्याचा विकेटकिपींगसाठी ओळखला जातो. तसेच, कठिण प्रसंगात संयमी त्याचबरोबर आक्रमक फलंदाजी करण्यातही ध्रुव तरबेज आहे. गेल्या वर्षभरात ध्रुवनं चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळं अंडर-19 युवा आशियाई चषकासाठी त्याची कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.

वाचा-मित्रा आता तरी रडणं बंद कर, भज्जीचे गिलख्रिस्टला 18 वर्षांनंतर सडेतोड उत्तर

भारतीय संघ : ध्रुव जुरेल (कर्णधार, विकेटकीपर), सुवेदार पारकर, ठाकुर तिलक वर्मा, नेहल वढेरा, अर्जुन आझाद, शास्वत रावत, वरुण लवांडे, सलिल अरोरा, करण लाल, अथर्व अंकोलेकर, पंकज यादव, आकाश सिंह, सुशांत मिश्रा, पूर्णांक त्यागी, विद्याधर पाटील.

वाचा-जमिनीवर पडला पण थांबला नाही! स्मिथच्या अजब स्टाईलनं प्रेक्षकही चक्रावले

VIDEO: कंबरेपर्यंत पाण्यात अडकलेल्या स्कूलबसमधील चिमुकल्यांच्या रेस्क्यू ऑपरेशनचा थरार

First published: September 5, 2019, 2:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading