IND vs WI-A, Practice Match : इशांत शर्माची तुफानी गोलंदाजी, स्वस्तात आटपला वेस्ट इंडिजचा डाव

IND vs WI-A, Practice Match : इशांत शर्माची तुफानी गोलंदाजी, स्वस्तात आटपला वेस्ट इंडिजचा डाव

भारतीय गोलंदाजांच्या तुफान कामगिरीमुळं वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ केवळ 181 धावात आटपला.

  • Share this:

अँटिगा, 19 ऑगस्ट : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात होत सराव कसोटी सामन्याचा दुसरा दिवस भारतीय गोलंदाजांनी गाजवला. भारतीय संघानं शनिवारी पाच विकेट गमावत 297 धावांवर डाव घोषित केला. याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज-ए संघाची सुरुवात खराब झाली. इशांत शर्मानं केवळ 21 धावा देत तीन विकेट घेतल्या तर, उमेश यादवनं एक विकेट घेतली. त्यामुळं वेस्ट इंडिजला 40 ओव्हरमध्ये 120 धावांवर 6 विकेट गमवाव्या लागल्या. सलामीला आलेला कावेम हॉजनं अर्धशतकी खेळी केली. हॉज वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला चांगली फलंदाजी करता आली नाही.

इशांत शर्मानं पाचव्या ओव्हरमध्ये जेरेमी सोलोजानोला बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर ब्रेंडन किंग चार धावा करत माघारी परतला. अनुभव डेरेन ब्राव्होचाही भारतीय गोलंदाजांसमोर टिकाव लागला नाही.

दरम्यान लंचनंतर हॉजनं आपल्या 50 धावा पूर्ण केल्या. त्यानंतर लगेचच इशांत शर्मानं पुन्हा एकदा फलंदाजाला स्वस्तात बाद केले. हॉजशिवाय कोणत्याही फलंदाजाला चांगली फलंदाजी करता न आल्यामुळं वेस्ट इंडिजचा डाव गडगडला. त्यामुळं वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ केवळ 181 धावात आटपला.

दुसरीकडे दुसऱ्या डावात मैदानावर उतरलेल्या भारतीय संघालाही आपली पहिली विकेट लवकर गमवावी लागली. मयंक अग्रवाल 13 धावा करत बाद झाला. दुसऱ्या डावात अजिंक्य रहाणे (20) आणि हनुमा विहारी (48) फलंदाजी करतील. सध्या भारतानं 84 धावा केल्या आहेत. तर, तब्बल 200 धावांची आघाडी भारताकडे आहे.

VIDEO: मुसळधार पावसामुळे कुल्लूजवळ दरड कोसळली

Published by: Akshay Shitole
First published: August 19, 2019, 9:30 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading