घरच्या मैदानात पुरुषांनी गमावलं तर विदेशात महिलांनी कमावलं! मुंबईकर खेळाडूनं राखली लाज

घरच्या मैदानात पुरुषांनी गमावलं तर विदेशात महिलांनी कमावलं! मुंबईकर खेळाडूनं राखली लाज

परदेशात भारतीय महिलांनी राखली लाज, मालिकेत 1-1नं केली बरोबरी.

  • Share this:

नवी दिल्ली, 04 नोव्हेंबर : एकीकडे भारतीय पुरुष संघाला घरच्या मैदानावर बांगलादेशकडून पराभव स्विकारावा लागला. तर, दुसरीकडे वेस्ट इंडिज विरोधात भारतीय महिला संघानं विजय मिळवला आहे. पहिल्या सामन्यात भारतीय महिला संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र दुसऱ्या सामन्यात 53 धावांनी विजय मिळवत मालिकेत 1-1नं बरोबरी केली आहे. पूनम राऊतच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतानं 191 धावा उभा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिचा संघ केवळ 138 धावांवर गारद झाला. या सामन्यात पूनम राऊतला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

रविवारी एकीकडे पुरुष संघानं बांगलादेश विरोधात सामना गमावला तर दुसरीकडे भारतीय महिला संघानं दणदणीत विजय मिळवला. भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राजनं दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताला चांगली सुरुवात करता आली नाही. केवळ 5 धावा करत जेमिमा रोड्रिगेज बाद झाली. त्यानंतर 17व्या धावांवर भारताला दुसरा झटका बसला, त्यानंतर पुनम राऊत आणि मिताली राज यांनी भारताचा डाव सांभाळला.

वाचा-क्रिकेटमधला अनोखा योगायोग, पती-पत्नीच्या कामगिरीची चर्चा होतेय व्हायरल

वाचा-दुर्दैवी! कुस्तीच्या मैदानातच पैलवानाचा मृत्यू, कोसळल्यानंतर पुन्हा उठलाच नाही

पुनम राऊतची यशस्वी खेळी

पुनम राऊत आणि मिताली यांन शानदार भागिदारी केल्यानंतर 40 धावा करत मिताली बाद झाली. मात्र पुनमनं आपल्या कामगिरीत सातत्य राखत अर्धशतक पूर्ण केले. या सामन्यात पुनमनं 128 चेंडूत 77 धावांची खेळी केली. यात 4 चौकार लगावले होते. तर, उप-कर्णधार हरमनप्रीत कौरनं 52 चेंडूत 46 धावा केल्या. या खेळीच्या जोरावर भारतान 6 विकेट गमावत 191 धावा केल्या.

वाचा-पंतनं दिला धोका आणि मैदानात सुरु झाला धोनी...धोनीचा जयघोष!

भारताची सफलतापूर्वक गोलंदाजी

भारतानं दिलेल्या 191 धावांचा पाठलाग वेस्ट इंडिजला करता आला नाही. राजेश्वरी गायकवाड, पुनम यादव आणि दिप्ती शर्मा यांनी चांगली गोलंदाजी करत वेस्ट इंडिजला 138 धावांवर गारद देले. या तिन्ही गोलंदाजांनी 2-2 विकेट घेतल्या. त्यामुळं भारतानं 53 धावांनी विजय मिळवला.

First published: November 4, 2019, 3:55 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading