धोनीच्या ‘त्या’ एका निर्णयावर भडकला सेहवाग, म्हणाला...

धोनीच्या ‘त्या’ एका निर्णयावर भडकला सेहवाग, म्हणाला...

वर्ल्ड कपनंतर विश्रांती घेतलेल्या धोनीनं काश्मीरमध्ये आपले ट्रेनिंग पूर्ण केले.

  • Share this:

नवी दिल्ली, 22 ऑगस्ट : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं वर्ल्ड कपनंतर विश्रांती घेत काश्मीरमध्ये लष्करात ट्रेनिंग घेण्याचा निर्णय घेतला. मात्र वर्ल्ड कप सेमीफायनल सामन्यात धोनीनं वापरलेल्या रणनितीची आजही चर्चा होत आहे. याबाबत सेहवागनं धोनीनं घेतलेल्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले आहे. सेहवागनं वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंड विरोधात भारतीय संघ चांगली कामगिरी करू शकला असता जर, संघानं धोनीला फलंदाजीसाठी आधी उतरवले असते. मॅंचेस्टरमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताला 18 धावांनी पराभव स्विकारावा लागला.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना सेहवागनं, “जर धोनीनं न्यूझीलंड विरोधात सातव्या क्रमांकावर न येता आधी फलंदाजी केली असती तर, निकाल काही वेगळे असते”, असे मत व्यक्त केले होते. तसेच, हार्दिक पांड्यानं सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येण्यास हरकत नव्हती, असेही मत सेहवागनं व्यक्त केले.

सेमीफायनलमध्ये सातव्या क्रमांकावर केली धोनीनं फलंदाजी

वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये धोनीनं सातव्या क्रमांकावर फलंदाजी केली. 30.3 ओव्हरमध्ये 90 धावांवर 6 विकेट अशी भारताची परिस्थिती असताना धोनी मैदानावर आला. त्यानंतर धोनी आणि जडेजा यांनी तब्बल 116 धावांची भागिदारी केली, आणि सामन्यात रोमांच आणला. जडेजानं 59 सामन्यात 77 धावांची आक्रमक खेळई केली. तर, धोनी 50 धावांवर रनआऊट झाला. हा सामना भारतानं 18 धावांनी हा सामना गमावला.

वाचा-अखेर भांडण मिटलं! विराटनं शेअर केला पण नेटकऱ्यांनी रोहितला केलं ट्रोल

पहिल्यासारखा धोनी आक्रमक नाही

सेहवागनं याआधी, धोनी पहिल्यासारखा आक्रमक नाही, असे मत व्यक्त केले होता. मोठे शॉट खेळण्यासाठी धोनीला बराच काळ लागतो. एक-एक धावा घेत धोनी स्कोअर वाढवतो. धोनीच्या धिम्या फलंदाजीवर सचिन तेंडुलकरनंही टीका केली होती. तर, हार्दिक पांड्या आणि ऋषभ पंत यांनी त्यांच्या स्वभावानुसार फलंदाजी केली. मात्र धोनीनं घेतलेल्या सातव्या क्रमांकावर येण्याचा निर्णय अयोग्य होता.

वाचा-घरचे दागिने विकले, उधारीने पैसे घेतले आणि भारताला जिंकून दिला वर्ल्ड कप

डोप टेस्ट खेळाडूंसाठी नवीन नाही

सेहवागनं बीसीसीआय नाडा अंतर्गत डोप टेस्ट करण्यात येणाऱ्यावर भाष्य केले आहे. सेहवागनं, “डोप टेस्ट काही नवीन गोष्ट नाही. याआधी ही खेळाडूंची डोप टेस्ट झाली आहे. घरेलू क्रिकेटमध्ये डोप टेस्ट होत असतात, आयपीएलमध्येही होतात. त्यामुळं खेळाडूंसाठी हे नवीन नाही”. मात्र, हा नियम खेळाडूंसाठी तेवढाच धोक्याचे ठरू शकते असेही मत सेहवागनं व्यक्त केले.

वाचा-विंडीजकडे विजयासाठी 160 ग्रॅमचं जादुई अस्र, टीम इंडियाला आहे धोका!

VIDEO : कार्यकर्त्याच्या आत्महत्येनंतर राज ठाकरे झाले भावूक, केलं हे आवाहन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 22, 2019 09:27 AM IST

ताज्या बातम्या