रोहित-विराट वादाला नवं वळण, कोहली पत्रकार परिषद घेणार पण...

रोहित-विराट वादाला नवं वळण, कोहली पत्रकार परिषद घेणार पण...

भारतीय संघात विराट आणि रोहित शर्मा असे दोन गट आहेत अशा चर्चा रंगल्या होत्या, आता या सगळ्या प्रकरणाला नवं वळण आलं आहे.

  • Share this:

मुंबई, 29 जुलै : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि उप-कर्णधार रोहित शर्मा यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत आहे. वर्ल्ड कप 2019मध्ये भारताच्या पराभवानंतर रोहित आणि विराट यांच्यात वादाला सुरुवात झाली होती. दरम्यान 3 ऑगस्टपासून वेस्ट इंडिज दौऱ्याला सुरुवात होणार आहे, यासाठी आज भारतीय संघ अमेरिकेला रवाना होणार आहे. त्याआधी विराट कोहली पत्रकारांशी संवाद साधणार नाही अशा चर्चा होत्या, मात्र रविवारी रात्री उशीरा बीसीसीआयच्या वतीनं कर्णधार कोहली पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार असल्याची माहिती दिली.

आज सायंकाळी सात वाजता भारतीय संघ पहिल्या दोन टी-20 सामन्यांसाठी अमेरिकेला रवाना होणार आहे. त्याआधी सायंकाळी सहा वाजता विराट कोहली पत्रकारांशी संवाद साधणार आहे. मात्र, या पत्रकार परिषदेत भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री उपस्थित राहणार नाही आहेत. यामुळं गेल्या अनेक वर्षांनी परंपरा तुटणार आहे. भारतीय संघ विदेश दौऱ्यावर जाण्याआधी कर्णधाराबरोबरच प्रशिक्षकही उपस्थित असतात. मात्र पहिल्यांदाच रवी शास्त्री पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार नाही आहेत.

या कारणामुळं रवी शास्त्री राहणार नाही उपस्थित

रवी शास्त्री यांचा हा भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून शेवटचा दौरा असू शकतो. वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी शास्त्री यांना 45 दिवसांचा वाढीव कालावधी देण्यात आला होता. त्यामुळं रवी शास्त्री पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार नाही.

वाचा- Tamil Nadu Premier League : भारताला मिळाला मलिंगा! एकच डोळा असून टाकतो बुमराहसारखा यॉर्कर

रोहित-विराट वाद पेटला

वर्ल़्ड कपनंतर विराट आणि रोहित शर्मा असे दोन गट आहेत अशा चर्चा रंगल्या आहेत. यात पहिला गट हा कर्णधार विराट कोहलीचा गट असून दुसरा गट हा उप-कर्णधार रोहित शर्माचा गट आहे. यावर बीसीसीआयचे प्रमुख विनोद राय यांनी, विराट-रोहितमध्ये कोणताच वाद नसल्याते मत व्यक्त केले आहे. राय यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना, "मीडियानं या बातम्या पसरवल्या आहेत. यात काहीच तथ्य नाही. भारतीय संघात कोणतीही गटबाजी नाही आहे", असे परखड मत व्यक्त केले होते.

वाचा-दारूच्या नशेत 'या' दिग्गज फलंदाजानं केल्या होत्या झंझावती 150 धावा!

रोहितनं केले अनुष्काला अनफॉलो

रोहित-विराट वर्ल्ड कपनंतर एकमेकांशी बोललेही नाही आहेत. दरम्यान आता रोहितनं विराटची पत्नी अनुष्का शर्माला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले आहे. त्यामुळं आता या वादाला नवा रंग आला आहे.रोहितनं यापूर्वी कोहलीलाही अनफॉलो केले होते.पण, कोहली इंस्टाग्रामवर अजूनही रोहितला फॉलो करतो. पण, रोहितची पत्नी कोहलीच्या फ्रेंड लिस्टमध्ये अजूनही नाही.

वाचा- T20 Blast : धोनीपेक्षाही चतुर निघाला 'हा' विकेटकीपर, VIDEO पाहून व्हाल हैराण!

Published by: Akshay Shitole
First published: July 29, 2019, 11:42 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading