‘मैदानात धोनी...धोनी ओरडू नका’, या कारणामुळे कॅप्टन कोहलीनं दर्शकांना केली विनंती

‘मैदानात धोनी...धोनी ओरडू नका’, या कारणामुळे कॅप्टन कोहलीनं दर्शकांना केली विनंती

असं काय झालं की विराटला दर्शकांना करावी लागली ही विनंती.

  • Share this:

हैदराबाद, 07 डिसेंबर : भारत-वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या पहिल्या सामन्यात कर्णधार विराट कोहलीचा रुद्र अवतार पाहायला मिळाला. विराटनं 50 चेंडूत 94 धावांची तुफानी खेळी करत टीम इंडियाला तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0ने आघाडी मिळवून दिली. या सामन्यात गोलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. तर यष्टीरक्षक ऋषभ पंतही बेजबाबदार शॉट खेळत बाद झाला.

ऋषभ पंतला संघात सतत संधी दिल्या जात आहेत. मात्र त्याला चांगली कामगिरी करता आलेली नाही. गेल्या काही सामन्यात पंतला मोठ्या धावा किंवा सामना जिंकून देण्यात यश आलेले नाही. त्याचबरोबर बांगलादेश विरोधात झालेल्या टी-20 मालिकेत पंतकडून यष्टीरक्षण करताना गंभीर चूका झाल्या, त्यामुळे त्याला जोरदार टीकांचा सामना करावा लागला आहे. मात्र असे असले तरी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं त्याला नेहमी पाठीशी घातले. त्यामुळं वेस्ट इंडिज विरोधात झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात संजू सॅमसनच्या जागी पंतलाच संधी देण्यात आली.

वाचा-टी-20 वर्ड कपसाठी टीम इंडियाचे 10 खेळाडू निश्चित! फक्त एका खेळाडूची जागा बाकी

दरम्यान टॉसनंतर पंतबाबत विचारले असता विराटनं, “त्याला एकटे सोडण्याची गरज आहे. आयपीएलमध्ये तो जसा खेळत होता, तशीच खेळी करेल. रिषभ पंत युवा खेळाडू असून त्याच्यावर संघाचा विश्वास आहे”, असे सांगितले होते. मात्र त्यानंतर धोनीबाबत विराटनं केलेल्या एका वक्तव्यामुळे धोनीचे चाहते मात्र नाराज झाले आहेत. विराट कोहलीनं, “मैदानात चाहत्यांनी धोनी-धोनी ओरडू नये. हे आदरणीय नाही. कारण कोणत्याही खेळाडूला असे झालेले आवडणार नाही”, असे मत व्यक्त केले. दरम्यान कोहलीच्या या वक्तव्याचे बीसीसीआय अध्यक्ष आणि माजी कर्णधार सौरव गांगुलीनं समर्थन केले आहे.

वाचा-VIDEO : ‘…आणि टीम इंडियानं जिंकला सामना’, राहुलनं सांगितला विराटचा मास्टरप्लॅन

दुसरीकडे महेंद्र सिंह धोनी तीन-चार महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर आहे. तर, ऋषभ पंतला धोनीचा उत्तराधिकारी म्हटले जात होते मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून ऋषभ पंतला चांगली कामगिरी बजावता आली नाही. त्यामुळे बांगलादेशविरुद्ध झालेल्या टी-20 मालिकेत मैदानात धोनी...धोनीचा नारा घुमू लागला होता. यावर विराट कोहलीने आपले मत व्यक्त केले. विराटनं, "चाहत्याने मैदानात धोनी धोनी असे ओरडू नये, हे आदणीय नाही. कारण कोणत्याही खेळाडूला असे झालेले आवडणार नाही. रिषभ पंत हा युवा खेळाडू आहे. त्याला इतके एकटे सोडूनही चालणार नाही की, तो मैदानात निराश होईल", असेही यावेळी म्हणाला.

वाचा-गोलंदाजांची विश्वविक्रमी धुलाई! 40 षटकांत एकट्याने 585 धावा काढून रचला इतिहास

वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात ऋषभ पंत 18 धावा करत बाद झाला. पंतने आपल्या खेळीत 2 षटकार खेचले, मात्र त्याला शेवटपर्यंत फलंदाजी करता आली नाही. बेजबाबदारपणे शॉट मारत बाद झाला. आता मालिकेचा दुसरा टी-20 सामना रविवारी तिरुअनंतपुरम येथे रविवारी खेळला जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 7, 2019 06:18 PM IST

ताज्या बातम्या