IND vs WI : वर्ल्ड कपमधला एक पराभव आणि पाच प्रश्न, विराटच्या पत्रकार परिषदेवर सर्वांचे लक्ष!

IND vs WI : वर्ल्ड कपमधला एक पराभव आणि पाच प्रश्न, विराटच्या पत्रकार परिषदेवर सर्वांचे लक्ष!

3 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी आज भारतीय संघ अमेरिकेला रवाना होणार आहे.

  • Share this:

मुंबई, 29 जुलै : वर्ल्ड कपनंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वेस्ट इंडिज दौरा करणार आहे. 3 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी आज भारतीय संघ अमेरिकेला रवाना होणार आहे. त्याआधी विराट कोहली पत्रकारांशी संवाद साधणार नाही अशा चर्चा होत्या, मात्र रविवारी रात्री उशीरा बीसीसीआयच्या वतीनं कर्णधार कोहली पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार असल्याची माहिती दिली.

आज सायंकाळी सात वाजता भारतीय संघ पहिल्या दोन टी-20 सामन्यांसाठी अमेरिकेला रवाना होणार आहे. त्याआधी सायंकाळी सहा वाजता विराट कोहली पत्रकारांशी संवाद साधणार आहे. मात्र, या पत्रकार परिषदेत भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री उपस्थित राहणार नाही आहेत. यामुळं गेल्या अनेक वर्षांनी परंपरा तुटणार आहे. भारतीय संघ विदेश दौऱ्यावर जाण्याआधी कर्णधाराबरोबरच प्रशिक्षकही उपस्थित असतात. मात्र पहिल्यांदाच रवी शास्त्री पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार नाही आहेत. दरम्यान विराटला पत्रकारांच्या या पाच प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहे.

1. वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी कसा झाला विराट तयार?

वर्ल्ड कपमधच्या साखळी सामन्यात विराट वेस्ट इंडिज दौऱ्यातून विश्रांती घेणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडकडून भारताला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. दरम्यान, विराटच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले. यातच रोहित शर्माकडे वेस्ट इंडिज दौऱ्याचे कर्णधारपद दिले जाणार आहे, अशा चर्चा वाढल्या होत्या. मात्र विराट कोहलीनं वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी खेळणार असल्याचे सांगितले.

2. रोहित सोबत असलेला वाद खरा आहे की खोटा?

वर्ल़्ड कपनंतर विराट आणि रोहित शर्मा असे दोन गट आहेत अशा चर्चा रंगल्या आहेत. यात पहिला गट हा कर्णधार विराट कोहलीचा गट असून दुसरा गट हा उप-कर्णधार रोहित शर्माचा गट आहे, अशा चर्चा होत्या. त्यामुळं आजच्या पत्रकार परिषदेत रोहितसोबत असलेल्या वादावर विराट स्पष्टीकरण देऊ शकतो.

3. रवी शास्त्री यांची हकालपट्टी संदर्भात

बीसीसीआयनं भारतीय संघाच्या नवा प्रशिक्षकासाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांची समिती प्रशिक्षकांच्या मुलाखती घेणार आहेत. वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर रवी शास्त्री यांची हकालपट्टी होऊ शकते. या सगळ्यावर विराटचे काय मत आहे, हे पाहणेही महत्त्वाचे आहे.

4. चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाचा शोध संपला आहे का?

वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरला तो मधल्या फळीचा प्रश्न. चौथ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करणार हा प्रश्न कायम होता. सध्या ऋषभ पंत चौथ्या क्रमांकासाठी आघाडीवर आहे, त्यामुळं नक्की कोणता फलंदाज ही जागा घेणार याबाबत कोहली माहिती देऊ शकतो.

5. धोनी आणि त्याच्या निवृत्तीबद्दल पुढे काय?

वर्ल्ड कपनंतर धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर विराटच्या सांगण्यावरून धोनीनं निवृत्ती जाहीर केली नाही, अशा चर्चा होत्या. त्यामुळं आजच्या पत्रकार परिषेदत विराट या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो.

वाचा-टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी आज होणार रवाना, संघातील वाद मात्र चव्हाट्यावर

वाचा-रोहित-विराट वादाला नवं वळण, कोहली पत्रकार परिषद घेणार पण...

man vs wild: पंतप्रधान मोदींचा अ‍ॅडव्हेंचरस अंदाज; पहिला टीझर रिलीज, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 29, 2019 03:48 PM IST

ताज्या बातम्या