‘हातात ग्लोव्हज घालून विकेटकिपर होत नाही’, माजी खेळाडूची ऋषभ पंतवर जहरी टीका

‘हातात ग्लोव्हज घालून विकेटकिपर होत नाही’, माजी खेळाडूची ऋषभ पंतवर जहरी टीका

ऋषभ पंतच्या जागी ऋद्धीमान साहाला संघात स्थान द्या, अशी मागणी या खेळाडूनं केली आहे.

  • Share this:

कोलकाता, 27 ऑगस्ट : वेस्ट इंडिज विरोधात भारतीय संघानं 318 धावांनी विक्रमी विजय मिळवला. मात्र, या सामन्यात ऋषभ पंतला चांगली फलंदाजी करता आली नाही. दोन्ही डावांत पंत स्वस्तात बाद झाला. पहिल्या डावात पंत 24 धावांवर बाद झाला तर, दुसऱ्या डावात केवळ 7 धावांवर बाद झाला. त्यामुळं पंतवर टीका करण्यास सुरुवात झाली आहे. याआधी एकदिवसीय मालिकेतही असाच प्रकार घडला होता.

भारताचे माजी विकेटकिपर सैयद किरमानी यांनी ऋषभ पंतच्या खराब खेळीवर जहरी टीका केली आहे. किरमानी यांनी दुसऱ्या कसोटी सामन्यात ऋषभ पंतला संघात न घेतला ऋध्दीमान साहाला संघात घ्यावे असे सांगितले. एवढेच नाही तर किरमानी यांनी, “हातात ग्लोव्हज घालून कोणी विकेटकीपर होत नाही”, अशा शब्दात पंतवर टीका केली आहे. किरमानी कोलकातामध्ये झालेल्या एका कार्यक्रमात बोलत होते. तसेच किरमानी यांनी, “पंतकडे खेळण्याची शैली आहे मात्र, त्याला शॉट खेळताना विचार करण्याची गरज आहे. अजूनही खुप काही शिकण्याचे बाकी आहे”, असे सांगितले.

पंतच्या जागी साहाला मिळावी संघात संधी

सैयद किरमानी यांनी, “यष्टीच्या मागे उभे राहणे खूप कठिण असते. त्यामुळं फक्त ग्लोव्हज घालून कोणी यष्टीरक्षक होऊ शकत नाही. साहा जखमी झाला होता, त्यामुळं काही काळ त्याला क्रिकेट खेळता आले नाही. मात्र त्याला संधी मिळायला हवी. त्याला संघात ठेवण्याचा काय अर्थ आहे जर, त्याला खेळण्याची संधी दिली नाही”, असे मत व्यक्त करत नाराजी व्यक्त केली. तसेच, साहाचे कौतुक करताना किरमानी यांनी, “साहानं घरच्या मैदानावर खुप चांगली कामगिरी केली आहे. मात्र, असे करूनही त्याल भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळं त्याला संधी देऊन कोण चांगले क्रिकेट खेळते ते पाहावे लागणार आहे”, असे सांगितले.

वाचा-20 लाख सामने, 7 हजार विकेट! अखेर 'या' दिग्गज खेळाडूनं घेतली निवृत्ती

ऋषभ पंतच्या शॉटवर उपस्थित झाले अनेक प्रश्न

अलिकडच्या काळात ऋषभ पंतच्या शॉट निवडीवर बरेच प्रश्न उपस्थित झाले आहेत. विश्वचषकाच्या उपांत्य फेरी असो वा वेस्ट इंडीज विरूद्ध टी -20 आणि एकदिवसीय मालिका असो, पंतने अत्यंत खराब फटका मारून विकेट गमावली. सेहवाग याच गोष्टीला त्याची कमकूवत बाजू मानतो. पंत सध्या वेस्ट इंडिजविरूद्ध एक कसोटी मालिका खेळत आहे जिथे त्याला अँटिगा कसोटीत स्वत: ला सिद्ध करण्याची संधी आहे. तसेट, त्याने कसोटी फलंदाज म्हणून इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये शतके केली आहेत आणि म्हणूनच त्याला ऋद्धिमान साहापेक्षा प्राधान्य दिले जाते.

वाचा-चेन्नई सुपकिंग्ज संघावर पुन्हा एकदा संकट! 300 कोटी प्रकरणी EDकडून होऊ शकते चौकशी

पंतला घ्यावी लागेल या गोष्टींची काळजी

सेहवागनं, "पंत शॉट मारताला त्यांची निवड करताना योग्य काळजी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी त्याला थोडा सराव करावा लागेल. जर त्यानं आपली शॉट खेळण्याची निवड योग्य केली तर, तो टीम इंडियात जास्त काळ खेळू शकतो", असे सांगितले होते.

वाचा-टेस्ट रॅकिंगमध्ये भारतीय खेळाडूंचा डंका! पाहा कोण कोणत्या क्रमांकावर

पंतमुळे टेंशन कायम

भारतानं जरी पहिल्या सामन्यात दणदणीत विजय मिळवला असला तरी विराटचं टेन्शन कमी झालेलं नाही. ऋषभ पंत पुन्हा एकदा अपयशी ठरला आहे. त्याला टी20 मध्ये एक सामना वगळता इतर सामन्यात फारशी चमक दाखवता आली नाही. आतापर्यंत अनेकवेळा पंतनं त्याला मिळालेली संधी गमावली आहे. वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये, टी20 मालिकेत आणि दुसऱ्या सामन्यातही पंत चुकीच्या फटक्यामुळं बाद झाला. त्यानं मोक्याच्या क्षणी विकेट गमावली.

वाचा-बुमराहच्या आऊट स्विंगनं केली कमाल! टेस्ट रॅकिंगमध्ये घेतली हनुमान उडी

'छोरा मुंबई किनारेवाला', आदित्य ठाकरेंबद्दलचा हा SPECIAL REPORT

Published by: Akshay Shitole
First published: August 27, 2019, 9:26 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading