India vs West Indies : दुसरा कसोटी सामना भारतासाठी महत्त्वाचा, पण झाला आहे एक बदल!

India vs West Indies : दुसरा कसोटी सामना भारतासाठी महत्त्वाचा, पण झाला आहे एक बदल!

टी-20, एकदिवसीयबरोबर कसोटी मालिका खिशात खालण्यासाठी हा सामना भारतासाठी महत्त्वाचा आहे.

  • Share this:

जमैका, 28 ऑगस्ट : भारत-वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघानं 1-0ने आघाडी घेतली आहे. पहिल्या कसोटी सामन्यात भारतानं 318 धावांनी वेस्ट इंडिजला पराभूत करत विजय मिळवला. या सामन्यात पहिल्या डावात भारतीय संघानं 297 धावा केल्या होत्या. तर विंडिजनं पहिल्या डावात 222 धावा केल्या. पहिल्या डावांत गोलंदाजीमध्ये इशांत शर्मान सर्वात जास्त म्हणजे 5 विकेट घेतल्या तर अजिंक्य रहाणे महत्त्वपूर्ण अशी 81 धावांची खेळी केली.

दरम्यान, दुसऱ्या डावांत भारताकडे चांगली आघाडी होती. त्यामुळं भारतानं 343 धावांवर डाव घोषित केला. मात्र, या आव्हानाचा पाठलाग करताना विंडिजच्या फलंदाजांची दमछाक झाली. चहापानापर्यंतच त्यांच्या 5 विकेट गेल्या होत्या. अखेर चौथ्या दिवशी विंडिजचा दाव 100 धावांवर आटपला. त्यामुळं भारताला 1-0ची आघाडी मिळाली. तर, भारच-वेस्ट इंडिज यांच्यात दुसरा कसोटी सामना 30 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. मात्र या सामन्यात एक मोठा बदल होणार आहे.

भारत-वेस्ट इंडिज सामन्याची वेळ बदलणार

भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार 7 वाजता सुरू झाला होता. मात्र दुसरा कसोटी सामना 8 वाजता सुरू होणार आहे. जमैकाच्या किंगस्टन येथील मैदानावर या मालिकेतील अखेरचा सामना खेळला जाणार आहे. हा सामना जिंकत भारतीय संघ 2-0नं ही मालिका जिंकण्यास सज्ज आहे.

वाचा-फलंदाजांना धडकी भरवणाऱ्या यॉर्कर किंगनं क्रिकेटसाठी सोडले होते घर!

येथे पाहू शकता सामना लाईव्ह

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात अँटिगुआ येथे होणारा पहिला कसोटी सामना सोनी टेन आणि सोनी टेन 3वर लाईव्ह पाहू शकता. याशिवाय Soni HDवरही सामना पाहू शकता.

टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये 120 गुण मिळवण्यास भारतीय संघ सज्ज

पहिल्या कसोटी सामन्यात 318 धावांनी विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. तसेच, दुसरा सामना जिंकल्यास भारतीय संघाचे 120 गुण होतील. भारतीय खेळाडूंचा फॉर्म पाहता दुसरा सामना जिंकणे कठिण जाणार नाही.

वाचा-Sorry मानसी! एका पायावर गोल्ड मिळवूनही आम्ही तुझी दखल घेण्यास कमी पडलो

पंतच्या जागी साहाला मिळणार का संधी

या सामन्यात ऋषभ पंतला चांगली फलंदाजी करता आली नाही. दोन्ही डावांत पंत स्वस्तात बाद झाला. पहिल्या डावात पंत 24 धावांवर बाद झाला तर, दुसऱ्या डावात केवळ 7 धावांवर बाद झाला. त्यामुळं पंतवर टीका करण्यास सुरुवात झाली आहे. याआधी एकदिवसीय मालिकेतही असाच प्रकार घडला होता.त्यामुळं माजी क्रिकेटर सैयद किरमानी यांनी, “यष्टीच्या मागे उभे राहणे खूप कठिण असते. त्यामुळं फक्त ग्लोव्हज घालून कोणी यष्टीरक्षक होऊ शकत नाही. साहा जखमी झाला होता, त्यामुळं काही काळ त्याला क्रिकेट खेळता आले नाही. मात्र त्याला संधी मिळायला हवी. त्याला संघात ठेवण्याचा काय अर्थ आहे जर, त्याला खेळण्याची संधी दिली नाही”, असे मत व्यक्त करत नाराजी व्यक्त केली. तसेच, साहाचे कौतुक करताना किरमानी यांनी, “साहानं घरच्या मैदानावर खुप चांगली कामगिरी केली आहे. मात्र, असे करूनही त्याल भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळं त्याला संधी देऊन कोण चांगले क्रिकेट खेळते ते पाहावे लागणार आहे”, असे सांगितले.

वाचा-सचिन विरोधातलं ट्वीट ICCला पडलं महागात, जगभरातील नेटीझन्सनं काढली इज्जत!

VIDEO : 'त्या' हॉटेलमध्ये ठरलं होतं, उद्धव ठाकरेंनी करून दिली भाजपला आठवण

First published: August 28, 2019, 5:26 PM IST

ताज्या बातम्या