IND vs WI : टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी आज होणार रवाना, संघातील वाद मात्र चव्हाट्यावर

IND vs WI : टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी आज होणार रवाना, संघातील वाद मात्र चव्हाट्यावर

वर्ल्ड कपमध्ये निराशाजनक कामगिरी केल्यानंतर भारतीय संघ आज वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी रवाना होणार आहे.

  • Share this:

मुंबई, 29 जुलै : वर्ल्ड कपमध्ये निराशाजनक कामगिरी केल्यानंतर भारतीय संघ आज वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. दरम्यान या दौऱ्यात विराट कोहलीला विश्रांती देण्यात येईल अशी चर्चा होती, मात्र तसे झाले नाही. यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यातील वादाला तोंड फुटले. वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी रोहित शर्मा कर्णधारपदासाठी सज्ज होता. यामुळं या दोघांमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत.

याआधी कर्णधारपद धोक्यात येऊ नये म्हणून विराट विंडीज दौऱ्यावर जात असल्याचं म्हटलं जात असलं तरी त्यामागचं सत्य वेगळंच आहे. विराट कोहलीने विंडीज दौऱ्यावर जाण्याचा निर्णय घेतला कारण वर्ल्ड कपमधील पराभवानंतर भारतीय खेळाडूं निराश झाले आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विराटने विंडीज दौऱ्यावर जाण्याचा निर्णय घेतला. यात दौऱ्यात हार्दिक पांड्याला विश्रांती देण्यात आली आहे. तर, नवदीप सैनी आणि श्रेयस अय्यर यांना संघात स्थान मिळाले आहे.

रोहित-विराट वाद पेटला

वर्ल़्ड कपनंतर विराट आणि रोहित शर्मा असे दोन गट आहेत अशा चर्चा रंगल्या आहेत. यात पहिला गट हा कर्णधार विराट कोहलीचा गट असून दुसरा गट हा उप-कर्णधार रोहित शर्माचा गट आहे. यावर बीसीसीआयचे प्रमुख विनोद राय यांनी, विराट-रोहितमध्ये कोणताच वाद नसल्याते मत व्यक्त केले आहे. राय यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना, "मीडियानं या बातम्या पसरवल्या आहेत. यात काहीच तथ्य नाही. भारतीय संघात कोणतीही गटबाजी नाही आहे", असे परखड मत व्यक्त केले होते.

वाचा-रोहित-विराट वादाला नवं वळण, कोहली पत्रकार परिषद घेणार पण...

पत्रकार परिषदेत विराट देणार स्पष्टिकरण

वेस्ट इंडिज दौऱ्याआधी विराट कोहली आज संध्याकाळी पत्रकार परिषद घेत पत्रकारांशी संवाद साधणार आहे. यावेळी रोहितसोबत असलेल्या वादावर विराट स्पष्टिकरण देऊ शकतो. दरम्यान बीसीसीआयच्या प्रमुखांनी वाद नसल्याचे सांगितले होते. त्यामुळं आजच्या पत्रकार परिषदेत काय होणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.

असा आहे वेस्ट इंडिजचा दौरा

वेस्ट इंडिज दौऱ्यात भारत तीन टी 20, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. या दौऱ्याची सुरुवात टी 20 मालिकेपासून होणार आहे. त्यानंतर एकदिवसीय मालिका 8 ऑगस्ट तर कसोटी मालिका 22 ऑगस्टला सुरू होणार आहे.

वाचा-भारताला मिळाला मलिंगा! एकच डोळा असून टाकतो बुमराहसारखा यॉर्कर

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारताचा टी-20 संघ- रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली (कर्णधार) केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), कृणाल पांड्या, रविंद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चाहर, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, दीपक चाहर, नवदीप सैनी.

एकदिवसीय संघ : रोहित शर्मा, सिखर धवन, विराट कोहली(कर्णधार) केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, नवदीप सैनी.

कसोटी संघ : मयंक अग्रवाल, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रोहित शर्मा, ऋषभ पंत, वृद्धीमान साहा, अश्विन, जडेजा, कुलदीप यादव इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, उमेश यादव.

वाचा- T20 Blast : धोनीपेक्षाही चतुर निघाला 'हा' विकेटकीपर, VIDEO पाहून व्हाल हैराण!

First published: July 29, 2019, 12:39 PM IST

ताज्या बातम्या