विराट-जडेजाच्या सेल्फीमुळे स्टार झाले आजोबा! नेटकऱ्यांनी घेतलं डोक्यावर

विराट-जडेजाच्या सेल्फीमुळे स्टार झाले आजोबा! नेटकऱ्यांनी घेतलं डोक्यावर

एका आजोबांमुळे झाला विराट कोहलीचा सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल. तुम्ही पाहिलात का फोटो.

  • Share this:

चेन्नई, 13 डिसेंबर : वेस्ट इंडिजला टी-20 मालिकेन नमवल्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ एकदिवसीय मालिकेही जिंकण्यासाठी सज्ज आहे. भारत-वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार आहे. 15 डिसेंबरला पहिला सामना चेन्नईला होणार आहे. यासाठी भारतीय संघ गुरुवारी चेन्नईला पोहचला. चेन्नईला पोहचल्यानंतर विराटनं रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांनी टीम बसमध्ये एक सेल्फी काढला. मात्र विराटच्या त्या सेल्फीपेक्षा एक आजोबांची सर्वात जास्त चर्चा होत आहे.

विराटनं चेन्नईला पोहचल्यानंतर ट्विटरवर हा सेल्फी शेअर केला होता, ज्यात बसच्या बाहेरून स्कूटरवर जाणाऱ्या एका आजोबांनी सर्वांचे लक्ष वेधले. या सेल्फीमध्ये नीट पाहिल्यास खिडकीच्या बाहेर उभे असलेले हे आजोबा, फोटोसाठी स्माईल देत आहेत. हा फोटो सध्या व्हायरल होत असून, नेटकऱ्यांनी या आजोबांना स्टार केले आहे.

वाचा-बाद झाल्यानंतर युसूफ पठाणनं काढला अजिंक्य रहाणेवर राग, VIDEO VIRAL

कोहलीच्या या सेल्फीवर एका चाहत्याने सांगितले की सेल्फीमध्ये वयस्कर आजोबांना टॅग करा. खरंतर कोहलीने हे चित्र कुलदीप आणि जडेजा यांना टॅग केले. तर काही नेटकऱ्यांनी, कोहलीला सांगितले की तू या काकाला टॅग करण्यास विसरला आहे. त्यामुळं विराटचा हा सेल्फी या आजोबांमुळे सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.

वाचा-विराटशी पंगा घेण्यासाठी केजरिक विल्यम्स खेळणार IPL, ‘हा’ संघ लावणार बोली

वाचा-VIDEO : बाप असावा तर असा! सामन्याआधी रोहितला आली लेकीची आठवण आणि...

एकदिवसीय मालिकेचा पहिला सामना रविवारी, दुसरा सामना विशाखापट्टणममध्ये 1 डिसेंबरला, तर, तिसरा आणि शेवटचा सामना 22डिसेंबरला कटक येथे होईल. यापूर्वी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टी -20 मालिकेत वेस्ट इंडीजला 2-1नं पराभूत केले. हैदराबादमध्ये झालेला पहिला टी-20 सामना विराटच्या 94 धावांच्या खेळीनं भारतानं जिंकला. तर, वेस्ट इंडीजने तिरुअनंतपुरममध्ये झालेल्या दुसऱ्या सामन्यात कमबॅक केला. यानंतर टीम इंडियाने वेस्ट इंडिजला मुंबईत खेळल्या गेलेल्या तिसर्‍या आणि निर्णायक टी -20 सामन्यात 67 धावांनी पराभूत करून मालिका जिंकली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 13, 2019 09:34 AM IST

ताज्या बातम्या