IND vs WI : वेस्ट इंडिज दौऱ्याचा IPL पॅटर्न, गेलसह 'हे' चार विस्फोटक खेळाडू पाडणार धावांचा पाऊस

ICC Cricket World Cupमध्ये निराशाजनक कामगिरी केल्यानंतर आता भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी सज्ज आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 18, 2019 03:52 PM IST

IND vs WI : वेस्ट इंडिज दौऱ्याचा IPL पॅटर्न, गेलसह 'हे' चार विस्फोटक खेळाडू पाडणार धावांचा पाऊस

ICC Cricket World Cupमध्ये निराशाजनक कामगिरी केल्यानंतर आता भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी सज्ज आहे. या दौऱ्याची सुरुवात 3 टी-20 सामन्यांपासून होणार आहे. भारतासाठी हा मालिका टी-20 वर्ल्ड कपसाठी फायदेशीर ठरू शकते. दरम्यान या मालिकेत या पाच खेळाडूंमुळं आयपीएल पॅटर्न पाहायला मिळणार आहे.

भारतीय संघाचा हिटमॅन रोहित शर्मानं वर्ल्ड कपमध्ये 5 शतक लगावत तुफानी कामगिरी केली आहे. या स्पर्धेत सर्वात जास्त धावा करण्याऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित पहिल्या क्रमांकावर होता. तसेच टी-20मध्येही रोहितचा रेकॉर्ड चांगला आहे. 94 सामन्यात त्यानं 16 अर्धशतक, चार शतक लगावत 2331 धावा केल्या आहेत. तर, वेस्ट इंडिज विरोधात त्यानं 334 धावा केल्या आहेत.

युनिवर्सल बॉस या नावाने जगप्रसिध्द असलेला ख्रिस गेल आपली शेवटची टी-20 मालिका खेळणार आहे. त्यामुळं त्याच्याकडून तुफानी फलंदाजीची अपेक्षा आहे. टी-20 क्रिकेटमध्ये गेलनं आतापर्यंत 58 सामन्यात 2 शतक आणि 13 अर्धशतक यांच्या जोरावर 1627 धावा केल्या आहेत. त्याचप्रमाणे आयपीएलचा अनुभव त्याच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.

टीम इंडियाची रनमशीन विराट कोहली वर्ल्ड कपमध्ये काहीसा फेल झालेला पाहायला मिळाला. त्यामुळं पुन्हा आपल्या फॉर्ममध्ये येण्यासाठी विराटसाठी हा दौरा महत्त्वाचा आहे. विराटनं टी-20 क्रिकेटमध्ये एकही शतक लगावलेले नाही. तसेच, 67 सामन्यात 20 अर्धशतकांच्या जोरावर त्यानं 2263 धावा केल्या आहेत.

2016चा टी-20 वर्ल्ड कप गाजवणारा खेळाडू म्हणजे कार्लोस ब्रेथवेट. अंतिम सामन्यात त्यानं बेन स्टोकला लगातार 4 षटकार लगावले होते. अशीच खेळी त्यानं यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंड विरोधात लगावली. त्यामुळं भारताविरोधातही त्याची बॅट तळपणार यात काही वाद नाही. ब्रेथनेटनं आतापर्यंत 38 टी-20 सामने खेळले आहेत. तर, भारताविरोधात 7.

2016चा टी-20 वर्ल्ड कप गाजवणारा खेळाडू म्हणधजे कार्लोस ब्रेथवेट. अंतिम सामन्यात त्यानं बेन स्टोकला लगातार 4 षटकार लगावले होते. अशीच खेळी त्यानं यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंड विरोधात लगावली. त्यामुळं भारताविरोधातही त्याची बॅट तळपणार यात काही वाद नाही. ब्रेथनेटनं आतापर्यंत 38 टी-20 सामने खेळले आहेत. तर, भारताविरोधात 7.

Loading...

टीम इंडियाच्या चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत त्या भारताचा युवा फलंदाज ऋषभ पंतवर. धोनीचा उत्तराधिकारी म्हणून पंतकडे पाहिले जाते. पंतनं आतापर्यंत 15 टी-20 सामन्यात एक अर्धशतक लगावत 233 धावा केल्या आहेत. तर, वेस्ट इंडिज विरोधात त्याला 4 सामन्यांचा अनुभव आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 18, 2019 03:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...