अखेर जमलं! हिटमॅननं चक्क पकडली कोहलीच्या नावाची पाटी, VIDEO VIRAL

रोहित-विराटमध्ये सर्व कुशलमंगल असल्याचे या व्हिडिओमधून दिसत आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 6, 2019 01:21 PM IST

अखेर जमलं! हिटमॅननं चक्क पकडली कोहलीच्या नावाची पाटी, VIDEO VIRAL

फ्लोरिडा, 06 ऑगस्ट : वर्ल्ड कपनंतर भारतीय संघात फूट पडल्याची चर्चा रंगली होती. विराट आणि रोहित शर्मा यांच्यात मतभेद असल्याचंही म्हटलं जात होतं. भारताचा कर्णधार विराट कोहलीनं विंडीज दौऱ्यावर जाण्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत असं काही नसल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर दोघांच्या सोशल मीडियावरील फोटोवरूनही पुन्हा मतभेदाची चर्चा झाली. आता रोहित शर्मा आणि जडेजाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. फ्रेंडशिप डे निमित्त एका कार्यक्रमात विराट आणि रोहित यांच्यात कुशल मंगल असल्याचे चित्र दिसत आहे.

याआधी भारत-वेस्ट इंडिज यांच्यात फ्लोरिडात झालेल्या पहिल्या टी20 सामन्यानंतर दोन्ही संघातील खेळाडू एकमेकांना भेटले. यावेळी विराट आणि रोहित यांच्यातील दुरावा स्पष्टपणे दिसला. विंडीजच्या खेळाडूंना भेटण्यासाठी रोहित पहिल्यांदा आला. त्यानंतर विराट कोहलीने भेट घेतली. या भेटीवेळी दोघांनी एकमेकांसमोर येणं टाळलं. मात्र आता नव्या आलेल्या या व्हिडिओनं पुन्हा यांच्यात मैत्री झाल्याचे दिसत आहे.

या व्हिडीओमध्ये रोहित शर्मा व रवींद्र जडेजा एक गेम खेळताना दिसत आहे. यामध्ये रोहितनं कार्ड न बघता जडेजाला दाखवत आहे. त्यात जडेजा इशाऱ्यामध्ये त्या कार्डवर काय लिहिले आहे हे रोहितला समजविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. त्यावर रोहित शर्मा उत्तर देण्याचा प्रयत्न करतो आहे. यामध्ये विराट कोहलीसह, जसप्रीत बुमराह यांची अ‍ॅक्टींग करताना दिसला. त्यामुळं यांच्यातील वाद आता मिटले आहेत, असे चित्र दिसत आहे.

दरम्यान याआधी वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनलनंतर प्रेझेंटेशन सेरेमनीला उपस्थित राहतानासुद्धा विराट सर्वांना भेटला होता. मात्र, त्यानं रोहित शर्माकडे न पाहताच निघून गेल्यानं दुराव्याची चर्चा सुरू झाली होती.

VIDEO: गावी जाण्याच्या विचारात असाल तर थांबा, पुणे-बंगळुरू महामार्गावर TRAFFIC जाम

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 6, 2019 01:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...