IND vs WI : वेस्ट इंडिजला मोठा धक्का, सामन्याआधीच पोलार्डवर झाली कारवाई

IND vs WI : वेस्ट इंडिजला मोठा धक्का, सामन्याआधीच पोलार्डवर झाली कारवाई

India vs West Indies : भारतीय संघाविरोधात अमेरिकेतील फ्लोरिडा मैदानावर झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात आयसीसीनं ही कारवाई केली.

  • Share this:

गुयाना, 06 ऑगस्ट : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज तिसरा टी-20 सामना होणार आहे. पहिल्या दोन सामन्यात पराभवाचा धक्का बसल्यानंतर आपली लाज राखण्याची संधी आज वेस्ट इंडिजला मिळणार आहे. आज रात्री 8 वाजता गुयाना येथील मैदानावर हा सामना होईल. मात्र या सामन्याआधीच वेस्ट इंडिज संघाला मोठा झटका बसला आहे.

वेस्ट इंडिजचा ऑलराऊंडर खेळाडू केरन पोलार्डवर कारवाई करण्यात आली आहे. पोलार्डनं आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केले, त्यामुळं त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. भारतीय संघाविरोधात अमेरिकेतील फ्लोरिडा मैदानावर झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात आयसीसीनं ही कारवाई केली. आचारसंहितेचा नियम क्रमांक 2.4चे उल्लंघन पोलार्डनं केले आहे, त्यामुळं त्याचा मॅच फीच्या 20 टक्के दंड आकारण्यात आला. त्याशिवाय त्याला एक डिमेरिट अंकही देण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यात पंचांनी दिलेला निकाल नाकारल्यामुळं ही कारवाई करण्यात आली होती.भारत-वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या सामन्यात केरन पोलार्डनं पंचांनी दिलेल्या निर्णय न मानता मैदानात बदली खेळाडूला आमंत्रण दिले. पंचांनी पोलार्डला काही काळ थांबण्यास सांगितले होते, मात्र त्यानं लगेचच बदली खेळाडूला मैदानावर बोलवले. यामुळं पोलार्डला दोषी ठरवत त्याला दंड आकारण्यात आला होता.

वाचा-युवराजनंतर शाहरुखचा 'हा' सिक्सर किंग निवृत्त, कसोटीत केलंय सर्वात वेगवान शतक

पोलार्डनं पहिल्या टी-20 सामन्यात केल्या 49 धावा

पोलार्डनं या मालिकेत सर्वात जास्त धावा केल्या आहे. अमेरिकेतील फ्लोरिडाच्या मैदानात झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात 49 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याच्याजोरावर वेस्ट इंडिजनं 95 धावांपर्यंत मजल मारली होती.

वाचा-अखेर जमलं! हिटमॅननं चक्क पकडली कोहलीच्या नावाची पाटी, VIDEO VIRAL

आज होणार शेवटचा सामना

भारतानं पहिल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवत ही मालिका 2-0ने जिंकली आहे. त्यामुळं औपचारिक होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजला घरच्या मैदानावर विजय मिळवण्याची संधी आहे. त्यानंतर भारत तीन एकदिवसीय सामने आणि दोन कसोटी सामनेही खेळणार आहे.

वाचा-टीम इंडियाच्या प्रशिक्षकाची निवड सर्वांच्या सहमतीनं नाही, COAनं केला 'हा' खुलासा

LIVE VIDEO पाण्यात गाडी घालण्याचं धाडस पडलं महागात; कारसह नदीत वाहून गेला तरुण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 6, 2019 04:11 PM IST

ताज्या बातम्या