INDvsWI 3rd T20 : भारत-वेस्ट इंडिज शेवटचा सामना, 'या' चॅनलवर पाहू शकता लाईव्ह मॅच

INDvsWI 3rd T20 : भारत-वेस्ट इंडिज शेवटचा सामना, 'या' चॅनलवर पाहू शकता लाईव्ह मॅच

INDvsWI : भारताने पहिले दोन्ही सामने जिंकून मालिका जिंकली असून अखेरच्या सामन्यात विजय मिळवून क्लीन स्वीपच्या तयारीत आहे.

  • Share this:

गयाना, 06 ऑगस्ट : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील तिसरा टी 20 सामना गयाना इथं होणार आहे. भारताने पहिले दोन्ही सामने जिंकून मालिका विजय साजरा केला आहे. भारतानं 8 वर्षांनी विंडीजविरुद्ध टी20 मालिका जिंकली आहे. पहिल्यास सामन्यात भारताला विजयासाठी झगडावं लागलं. तर दुसऱ्या सामन्यात एकतर्फी विजय मिळवला.

भारताचा सलामीवीर रोहित शर्माचा वर्ल्ड कपमधील फॉर्म कायम आहे. भारताकडून दोन्ही सामन्यात त्यानं सर्वाधिक धावा केल्या आहेत. गोलंदाजीत भुवनेश्वर कुमार आणि कृणाल पांड्या फॉर्ममध्ये आहेत. तिसऱ्या टी20 मध्ये भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. राहुल आणि दीपक चाहर यांना संधी मिळू शकते.

यजमान विंडीजसमोर मोठी आव्हाने आहेत. त्यांच्या गोलंदाजांना भारतीय फलंदाजांना रोखण्यात अपयश आलं. फलंदाजीत दोन्ही सामन्यात सलामीची जोडी अपयशी ठरली. पोलार्ड वगळता एकही फलंदाज फटकेबाजी करू शकला नाही. क्लीन स्वीप टाळण्यासाठी विंडीजला विजयाची गरज आहे.

येथे पाहू शकता India vs West Indies यांच्यातील टी-20 सामना

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात होणारा टी-20 सामना सोनी नेटवर्कवर लाईव्ह पाहू शकता. (Sony Network) याशिवाय Sony Ten SD/HD आणि Sony Ten 3 SD/HD वर पाहू शकता. हा सामना आठ वाजता सुरु होणार आहे.

4 मजली इमारतीला आग, 6 जणांचा होरपळून मृत्यू, आगीचा भीषण VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Aug 6, 2019 09:50 AM IST

ताज्या बातम्या