India vs West Indies 2nd T20 Live Score : भारत-वेस्ट इंडिज दुसऱ्यांदा भिडणार, 'या' चॅनलवर पाहू शकता लाईव्ह मॅच

India vs West Indies 2nd T20 Live Score : भारत-वेस्ट इंडिज दुसऱ्यांदा भिडणार, 'या' चॅनलवर पाहू शकता लाईव्ह मॅच

विंडीजविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारताने 4 गडी राखून विजय मिळवला आहे. दुसरा सामना आज रात्री 8 वाजता होणार आहे.

  • Share this:

फ्लोरिडा, 04 ऑगस्ट : भारताने विंडीजविरुद्धचा पहिला टी-20 सामना चार गडी राखून जिंकला. आज (रवीवार) दुसरा सामना रात्री 8 वाजता सुरू होणार आहे. दोन्ही सामने अमेरिकेतील फ्लोरिडा शहरात होत आहेत. टी-20 वर्ल्ड कप 2020च्या दृष्टीने भारतासाठी ही मालिका महत्त्वाची आहे.

भारताच्या वरिष्ठ खेळाडूंना या मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे. अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत युवा खेळाडूंनी जबरदस्त कामगिरीचे प्रदर्शन केलं आहे. नवदीप सैनीने पदार्पणाच्या सामन्यात 3 गडी बाद केले. भारताला पहिल्या सामन्यात विजय मिळाला असला तरी त्यासाठी फलंदाजांची चांगलीच दमछाक झाली. 96 धावांचे आव्हान गाठण्यासाठी 18 षटके झुंज द्यावी लागली.

विंडीजच्या संघातही ख्रिस गेल, आंद्रे रसेल यांच्या अनुपस्थितीने आघाडीची फलंदाजी दुबळी झाली आहे. कार्लोस ब्राथवेटच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या वेस्ट इंडिज संघांत सर्व भिस्त केरन पोलार्ड, सुनील नरेन, शेल्डन कॉट्रेल आणि ओशेन थॉमस यांच्यावर आहे.

येथे पाहू शकता India vs West Indies यांच्यातील पहिला टी-20 सामना

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात होणारा टी-20 सामना सोनी नेटवर्कवर लाईव्ह पाहू शकता. (Sony Network) याशिवाय Sony Ten SD/HD आणि Sony Ten 3 SD/HD वर पाहू शकता. हा सामना आठ वाजता सुरु होणार आहे. हा सामना अमेरिकेतील फ्लोरिडाच्या ब्रोवार्ड काऊंटी मैदानावर होणार आहे.

वाचा- 5 वर्षांनंतर भारताकडे अशी असेल फलंदाजांची फौज!

VIDEO : ...आणि थोडक्यात वाचला जीव, नाशिकमध्ये कोसळला वाडा; थरार कॅमेऱ्यात कैद

Published by: Suraj Yadav
First published: August 4, 2019, 5:59 PM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या