पदार्पणातच नवदीप सैनीला जल्लोष पडला महागात, आयसीसीनं केली कारवाई!

पहिल्या टी-20 सामन्यात पूरनची विकेट घेतल्यानंतर सैनीनं आक्रमक जल्लोष केला होता.

News18 Lokmat | Updated On: Aug 5, 2019 05:42 PM IST

पदार्पणातच नवदीप सैनीला जल्लोष पडला महागात, आयसीसीनं केली कारवाई!

फ्लोरिडा, 05 ऑगस्ट : वेस्ट इंडिज विरोधात झालेल्या टी-0 सामन्यात पदार्पण करणाऱ्या नवदीप सैनीनं पहिल्याच सामन्यात 3 विकेट घेत सामनावीराचा पुरस्कार मिळवला होता. आपल्या शानदार लाईन आणि लेंथच्या जोरावर नवदीपनं सर्वांचे मन जिंकले. पदार्पणातच चांगली कामगिरी करणाऱ्या या खेळाडूवर मात्र आता आयसीसीच्या कारवाईची तलवार आहे.

पहिल्या टी-20 सामन्यात निकोलस पूरनला बाद केल्यानंतर नवदीपनं आक्रमक प्रकारे जल्लोष केले. यामुळ त्याला पंचांनी चेतावणीही दिली. आता मात्र आयसीसीच्या कोड ऑफ कंडक्टनुसार नवदीपला दोषी ठरवण्यात आले आहे, त्यामुळं आता त्याच्यावर कारवाई होऊ शकते.

दरम्यान सैनीनं आपली चूक मान्य केली आहे, त्यामुळं आता यावर कोणत्याही प्रकारची सुनावणी होणार नाही आहे. पहिल्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडिजवर 4 विकेटनं मात दिली. या सामन्यात 17 धावा देत 3 विकेट घेणाऱ्या नवदीपला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. दरम्यान, सैनीनं आयसीसीचा नियम 2.5 नियमाचे उल्लंघन केल्यामुळं त्याला डीमेरिट पॉईंट देण्यात आले आहेत.

वाचा-सैनीच्या पदार्पणानंतर वाद पेटला, गंभीर आणि 2 माजी क्रिकेटपटू भिडले

Loading...

वाचा- युवराज सिंग गंभीर जखमी, सामना सुरु असतानाच सोडलं मैदान!

काय होते नवदीपच्या त्या जल्लोष मागचे कारण

नवदीपच्या त्या आक्रमक जल्लोषा मागचे कारण म्हणजे पूरनं त्याला मारलेला षटकार होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिलीच ओव्हर टाकणाऱ्य़ा नवदीपला त्याच्या दुसऱ्याच चेंडूवर पूरननं सिक्स मारला. सैनीनं दोन चेंडूनंतर पूरनला बाद केले, त्यामुळं त्याने आक्रमक जल्लोष केला.

भारतानं जिंकली टी-20 सीरिज

रविवारी टीम इंडियानं वेस्ट इंडिजला दुसऱ्या टी-20 सामन्यात मात देत टी-20 सीरीजवर कब्जा केला. पावसामुळं डकवर्थ लुईस नियमानुसार भारतानं 22 धावांनी हा सामना जिंकला. भारताचा शेवटचा टी-20 सामना मंगळवारी होणार आहे.

वाचा-फक्त जाहिरातीतून विराट कमवतो 146 कोटी, रोहितचा पगार वाचून तुमचे डोळे चक्रावतील!

VIDEO: मराठमोळ्या फ्लाईट लेफ्टनंटचं भारतभर कौतुक, धोका पत्करत महिलेला केलं AIRLIFT

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 5, 2019 05:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...