IND vs WI 2nd ODI : ऋषभ पंतचे स्थान धोक्यात? गावसकर यांनी सांगितला चौथ्या क्रमांकाचा दावेदार

IND vs WI 2nd ODI : ऋषभ पंतचे स्थान धोक्यात? गावसकर यांनी सांगितला चौथ्या क्रमांकाचा दावेदार

आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपपासून चौथ्या क्रमाकांच्या फलंदाजाचा तिढा काही सुटलेला नाही.

  • Share this:

मुंबई, 12 ऑगस्ट : आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपपासून टीम इंडियाच्या चौथ्या क्रमाकांच्या फलंदाजाचा तिढा काही सुटलेला नाही. वर्ल्ड कपमध्येही या स्थानावरून अनेक वाद झाला. केएल राहुल आणि विजय शंकर यांनी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केल्यानंतर निवड समितीने ऋषभ पंतला योग्य दावेदार मानले. मात्र पंतला योग्य कामगिरी करता आली नाही.

वर्ल्ड कपनंतर वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघानं टी-20 मालिका आपल्या खिशात घातली. यानंतर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही भारतानं विजय मिळवला. मात्र, या सगळयात तीसऱ्या टी-20 सामन्यात अर्धशतकी खेळी वगळता ऋषभ पंतला चांगली कामगिरी करता आली नाही. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही पंत केवळ 20 धावा करत बाद झाला. दरम्यान एकदिवसीय संघात सामिल करण्यात आलेल्या श्रेयस अय्यरला पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करावी लागली.

या सामन्यातही पंत बेजबाबदारपणे शॉट मारण्याच्या नादात बाद झाला. पंत बाद झाला तेव्हा भारताची अवस्था 3 बाद 101 अशी झाली होती. त्यावेळी विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी 125 धावांची भागिदारी केली. कोहली 120 धावा करून बाद झाला. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या श्रेयस अय्यरनं अर्धशतकी खेळी केली. त्याने 68 चेंडूत 71 धावांची खेळी केली. यात त्यानं पाच चौकार आणि एक षटकार मारला. अय्यरने 100 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटनं धावा केल्या. त्यामुळं विराट आणि अय्यर यांच्या खेळीच्या जोरावर भारतानं विंडीजला 279 धावांचं आव्हान दिलं. त्यानंतर भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारनं 31 धावा देत 4 गडी बाद करून विंडीजची दाणादाण उडवली. पावसामुळं डकवर्थ लुईस नियमानुसार विंडीजला 46 षटकांत 269 धावांचे आव्हान देण्यात आलं होतं. त्यांना 210 धावांपर्यंत मजल मारता आली.

वाचा-IND vs WI 2nd ODI : विंडीजविरुद्ध पंतनं गमावलेल्या संधीचं अय्यरनं केलं सोनं

गावसकर म्हणतात चौथ्या क्रमांकासाठी अय्यरचं बेस्ट!

भारचीय संघाचे माजी फलंदाज सुनील गावसकर यांनी चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यरची उत्तम असल्याचे मत व्यक्त केले. तर, ऋषभ पंतहा महेंद्रसिंग धोनीसारखा पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येऊ शकतो. तसेच, श्रेयस अय्यर हा चौथ्या क्रमांकाचा योग्य दावेदार असल्याचे त्यांनी सांगितले.

विराटनं केले अय्यरचे कौतुक

श्रेयस अय्यरच्या खेळीचं विराट कोहलीनं कौतुक केलं. भारताच्या आघाडीच्या फळीतील एखादा तरी फलंदाज मोठी खेळी करतो. पण या सामन्यात रोहित-धवन लवकर बाद झाले त्यानंतर मोठी खेळी करणं आणि संघाचा डाव सावरणं गरजेचं होतं. श्रेयसचा आत्मविश्वास चांगला आहे. त्याला कधी सिंगल-डबल घ्यायची आणि कधी मोठे फटके मारायचे हे माहिती आहे. त्याच्या फलंदाजीनं माझं काम सोपं झाल्याचं विराट कोहली म्हणाला.

वाचा-विक्रमांचा ‘विराट’ बादशाह! गांगुलीसह अनेक विक्रमवीरांना टाकले मागे

पंतची सरासरी केवळ 25.44

पंतनं आतापर्यंत 11 एकदिवसीय सामन्यात 9 डावात 25.44च्या सरासरीनं फलंदाजी करत 229 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकटमध्ये त्याची 48 ही सर्वोत्कृष्ट खेळी राहिली आहे. तर, त्याचा स्ट्राईक रेटहा 97.03 आहे. दुसरीकडे पंतनं 18 टी-20 सामन्यात 21.57च्या सरासरीनं 302 धावा केल्या आहेत. यात 65 ही त्याची सर्वोत्कृष्ट खेळी राहिली आहे.

श्रेयसच्या नावावर 6 डावांत 3 अर्धशतक

श्रेयस अय्यरनं आपल्या शानदार खेळीच्य़ा जोरावर 8 एकदिवसीय सामन्यात तीन अर्धशतकांच्या जोरावर 281 धावा केल्या आहेत. यात त्यानं केवळ 6 डावांत फलंदाजी केली. पाचव्या क्रमांकावर तीन वेळा खेळत त्यानं 119 धावा केल्या आहेत. तर, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना 162 धवा केल्या आहेत. त्याची सरासरी 46.83 असून स्ट्राईक रेट 98.25 आहे.

वाचा-विजयानंतरही टीम इंडियाची वाढली डोकेदुखी, ही आहेत 3 कारणं

VIDEO :'..म्हणून ए चूप बसायचं' म्हटलो, चंद्रकांत पाटलांचा खुलासा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 12, 2019 03:18 PM IST

ताज्या बातम्या