India vs West Indies : शिखर धवन वन डे घेणार संघातून माघार? ‘या’ 4 खेळाडूंना मिळू शकते संधी

India vs West Indies : शिखर धवन वन डे घेणार संघातून माघार? ‘या’ 4 खेळाडूंना मिळू शकते संधी

भारत-वेस्ट इंडिज यांच्यात 15 डिसेंबरपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे.

  • Share this:

मुंबई, 10 डिसेंबर : भारत-वेस्ट इंडिज यांच्यात संध्या तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेनंतर लगेचच तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. याआधी टी-20 मालिकेतून शिखर धवननं दुखापतग्रस्त असल्यामुळे माघार घेतली होती. आता एकदिवसीय संघातूनही शिखर धवन माघार घेऊ शकतो. टी-20मध्ये संजू शिखर धवनच्या जागी संजू सॅमसनला संघात स्थान देण्यात आले होते. त्यामुळं विराट आता एकदिवसीय संघात कोणत्या खेळाडूला स्थान देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

भारत-वेस्ट इंडिज यांच्यात 15 डिसेंबरपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. त्याआधी डाव्या हाताचा फलंदाज शिखर धवन मालिकेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. जर असे झाले तर पाच युवा खेळाडूंना संधी मिळू शकते. तथापि, निवड समितीत शिखर धवनची जागा घेणारे चार खेळाडू आहेत. अशा परिस्थितीत धवनच्या जागी कोणत्या खेळाडूला संघात स्थान द्यायचे हे संघ व्यवस्थापनाला ठरवणे कठिण जाणार आहे.

वाचा-धोनीबद्दल शास्त्रींचा मोठा खुलासा, 'त्याला विश्रांती घ्यायची होती पण...'

शिखर धवनच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे

सैयद मुश्तल अली ट्रॉफी दरम्यान शिखर धवनला डाव्या गुडघ्यात दुखापत झाली होती. त्याच्या गुडघ्याला गंभीर जखम झाल्यामुळे तो काही काळ क्रिकेट खेळू शकणार नाही आहे. त्यामुळं त्याला टी -20 मालिकेतून वगळण्यात आले. शिखर धवनला टी -20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी निवड समितीत संघात स्थान देण्यात आले होते, पण आता दुखापतीमुळे गंभीर एकदिवसीय मालिका खेळू शकणार नसल्याचे दिसत आहे. रविवारी पहिला वनडे सामना खेळला जाणार आहे.

वाचा-मुंबई इंडियन्स लावणार 'विराट'वर बोली, लिलावात हे 5 खेळाडू रडारवर

हे 4 खेळाडू सलामीचे दावेदार

शिखर धवनला वगळले तर त्याच्या जागी संघात समावेश असलेल्या चार खेळाडूंमध्ये संजू सॅमसन, मयंक अग्रवाल, शुभमन गिल आणि पृथ्वी शॉ यांचा समावेश आहे. संजू सॅमसनला बांगलादेशविरोधात टी-20 संघा 15 खेळाडूंनमध्ये संधी मिळाली होती, मात्र त्याला एकही सामना खेळता आला नाही. दरम्यान आता वेस्ट इंडिज विरोधातही संजूला संधी मिळाली नाही आहे. तर कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून मयंक अग्रवालनं जबरदस्त खेळी केली आहे. त्याचबरोबर शुभमन गिलनेही प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. दुसरीकडे, पृथ्वी शॉ बॅननंतर रणजीमध्ये चांगली कामगिरी करत. त्यामुळं हा चारपैकी एकाला संघात जागा मिळू शकते.

वाचा-IPL लिलावात होणार टक्कर! ‘या’ खेळाडूंसाठी भिडणार मुंबई आणि बंगळुरू संघाचे मालक

असा आहे भारताचा एकदिवसीय संघ- विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत, शिवम दुबे, केदार जाधव, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चाहर, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 10, 2019 12:53 PM IST

ताज्या बातम्या