'याच्यासारखं दुर्दैव काहीच नाही', रोहितसोबतच्या वादावर विराटनं केला मोठा खुलासा

'याच्यासारखं दुर्दैव काहीच नाही', रोहितसोबतच्या वादावर विराटनं केला मोठा खुलासा

वेस्ट इंडिज दौऱ्याआधी विराटनं पहिल्यांदाच रोहितसोबतच्या वादावर भाष्य केले.

  • Share this:

मुंबई, 29 जुलै : वर्ल्ड कपमध्ये पराभवाचा धक्का सहन केलेली विराटसेना आज वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी रवाना झाली. त्याआधी कर्णधार विराट कोहली आणि रवी शास्त्री यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी विराटनं रोहितसोबतच्या वादावर पहिल्यांदाच भाष्य केले. तसेच विराटनं वर्ल्ड कपनंतर विश्रांती घेण्याचा कोणताही उद्देश नसल्याचेही स्पष्ट केले.

गेल्या काही दिवसांपासून भारतीय संघात गटबाजी असल्याच्या चर्चा होत्या. यात विराट आणि रोहित शर्मा असे दोन गट आहेत आणि या दोघांनी वर्ल्ड कपनंतर एकमेकांशी भाष्य केलेले नव्हते. मात्र वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाण्याआधी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषेदत विराटनं या प्रकरणावर भाष्य केले. विराटनं, "संघात गटबाजी असती तर आम्ही वर्ल्ड कपमध्ये चांगली कामगिरी केलीच नसती. संघ हा सांघिक खेळीच्या जोरावर सेमीफायनलपर्यंत पोहचतो. ड्रेसिंग रूममधील वातावरण अतीशय उत्तम आहे", असे म्हणत संघातील गटबाजी प्रकरणावर पडदा टाकला.

रोहितवादावर विराटनं केले भाष्य

पत्रकार परिषदेत विराटला रोहितसोबत असलेल्या वादावर विचारले असता, "या अशा चर्चा होत आहेत हेच खुप वाईट आहे. आम्ही जेव्हा चांगलं खेळतो तेव्हा सगळे आमचे कौतुक करतात, आणि आता हिच लोक अशा गोष्टी पसरवत आहेत. ड्रेसिंग रूममध्ये जेव्हा तुम्ही प्रवेश करता तेव्हा खेळीमेळीचे वातावरण असते. भारतीय संघाला टॉपवर पोहचवणे हे आमचे ध्येय आहे", असे सांगत विराट-रोहित वादाला पुर्णविराम दिला.

विश्रांती घेण्याचा कोणताच उद्देश नव्हता

फिजिओ आणि ट्रेनर यांच्या हातात हे निर्णय असतात. विश्रांती घेण्याचा माझा कोणताही उद्देश नव्हता. सगळेच वर्ल्ड कपमध्ये पराभव मिळाल्यामिळे निराश होते, पण आपल्याला पुढे जाण्याची गरज आहे. ऑस्ट्रेलियामध्ये होत असलेल्या टी-20 वर्ल्ड कपसाठी ही मालिका महत्त्वाची आहे.

असा आहे वेस्ट इंडिजचा दौरा

वेस्ट इंडिज दौऱ्यात भारत तीन टी 20, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे. या दौऱ्याची सुरुवात टी 20 मालिकेपासून होणार आहे. त्यानंतर एकदिवसीय मालिका 8 ऑगस्ट तर कसोटी मालिका 22 ऑगस्टला सुरू होणार आहे.

वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारताचा टी-20 संघ- रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली (कर्णधार) केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), कृणाल पांड्या, रविंद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चाहर, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, दीपक चाहर, नवदीप सैनी.

एकदिवसीय संघ : रोहित शर्मा, सिखर धवन, विराट कोहली(कर्णधार) केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, नवदीप सैनी.

कसोटी संघ : मयंक अग्रवाल, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रोहित शर्मा, ऋषभ पंत, वृद्धीमान साहा, अश्विन, जडेजा, कुलदीप यादव इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, उमेश यादव.

man vs wild: पंतप्रधान मोदींचा अ‍ॅडव्हेंचरस अंदाज; पहिला टीझर रिलीज, पाहा VIDEO

First published: July 29, 2019, 6:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading