धवन-राहुलला मिळणार 'या' मराठमोळ्या खेळाडूचं चॅलेंज, आकडे पाहून व्हाल हैराण

धवन-राहुलला मिळणार 'या' मराठमोळ्या खेळाडूचं चॅलेंज, आकडे पाहून व्हाल हैराण

हा पुणेकर खेळाडू भारताचा सलामीचा फलंदाज शिखर धवन आणि के एल राहुल यांच्यासाठी धोक्याचा ठरू शकतो.

  • Share this:

मुंबई, 27 जुलै : वर्ल्ड कपनंतर भारतीय संघ 3 ऑगस्टपासून वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. दरम्यान या दौऱ्यात भारतीय 'अ' संघाचा फलंदाज शुभमन गील याला संधी देण्यात आली नाही, यावरून अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी निवड समितीला धारेवर धरले. मात्र भारतीय 'अ' संघातील आणखी एका युवा खेळाडूला भारतीय संघात जागा मिळाली नाही. हा युवा खेळाडू भारताचा सलामीचा फलंदाज शिखर धवन आणि के एल राहुल यांच्यासाठी धोक्याचा ठरू शकतो. हा खेळाडू आहे पुणेकर ऋतुराज गायकवाड.

महाराष्ट्रासाठी रणजी क्रिकेट खेळणारा पुणेकर ऋतुराज गायकवाड यानं वेस्ट इंडिज विरोधात चार सामन्यात दोन अर्धशतक लगावत 207 धावा केल्या. शेवटच्या सामन्यात केवळ एका धावांनी त्याचे शतक हुकले. ऋतुराज 99 धावांवर बाद झाला. मात्र, गेल्या काही महिन्यात ऋतुराज टीम इंडिया 'अ'साठी रनमशीन ठरत आहे. 8 सामन्यात त्यानं 112.83च्या सरासरीनं 677 धावा केल्या आहेत.

वाचा- 'तुच खरा मॅच विनर', मलिंगाच्या निवृत्तीवर भावुक झाला रोहित!

याआधी श्रीलंका 'अ' विरोधात झालेल्या मालिकेत त्यानं 5 सामन्यात 470 धावा केल्या होत्या. या मालिकेत ऋतुराजनं नाबाद 187, नाबाद 125, 84 आणि 74 धावांची खेळी केली आहे. 4 सामन्यात तो केवळ 2 वेळा बाद झाला. 22 वर्षांचा ऋतुराज रणजीमध्ये महाराष्ट्रासाठी सलामीला फलंदाजी करतो. आयपीएलमध्ये ऋतुराज चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडून खेळतो, मात्र त्याला आतापर्यंत एकाही सामन्यात संधी मिळालेली नाही.

प्रथम श्रेणीतही रनमशीन

प्रथम श्रेणीतील 12 सामन्यात ऋतुराजनं 38.17 सरासरीत 813 धावा केल्या आहेत. यात 2 शतक आणि 4 अर्धशतकांचा समावेश आहे. तर, लिस्ट एमध्ये 39 सामन्यात त्यानं 57.08च्या सरासरीनं 2055 धावा केल्या आहेत. यात 5 शतक आणि 14 अर्धशतकांचा समावेश आहे.

वाचा-रोहित-विराट वाढता वाद, बीसीसीआय प्रमुखांनी केला मोठा खुलासा

लवकरच मिळू शकते टीम इंडियाचे तिकिट

20व्या वर्षी विजय हजारे ट्रॉफीमध्ये पदार्पण करणाऱ्या ऋतुराजला भारतीय संघात स्थान मिळू शकते. सलामीचा फलंदाज असलेल्या ऋतुराजला वेस्ट इंडिज दौऱ्यात स्थान मिळाले नसले तरी, येणाऱ्या काही महत्त्वाच्या मालिकांमध्ये संधी मिळू शकते.

वाचा-अनुष्का शर्माचा हिटमॅनवर पलटवार, रोहित-विराट वाद चिघळला!

VIDEO: मुसळधार पावसामुळे डोंबिवली, दिवा परिसरात कंबरेएवढं पाणी

Published by: Akshay Shitole
First published: July 27, 2019, 4:54 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading