वेस्ट इंडिजमध्ये 'हे' चार खेळाडू चालले नाही तर टीम इंडियातून होणार पत्ता कट!

निवड समितीनं 2023 वर्ल्ड कपला समोर ठेवून वेस्ट इंडिज विरोधात जास्तीत जास्त युवा खेळाडूंना संघात स्थान दिले आहे.

  • Share this:

वर्ल्ड कपमध्ये पराभूत झाल्यानंतर आता भारतीय संघ वेस्ट इंडिज विरोधात खेळण्यास सज्ज आहे. 3 ऑगस्टपासून वेस्ट इंडिज दौऱ्य़ाला सुरुवात होणार आहे. यात 3 टी-20, 3 एकदिवसीय आणि 2 कसोटी सामने खेळले जाणार आहेत.

2019 वर्ल्ड कपमध्ये पराभव स्विकारल्यानंतर निवड समितीने फॉर्ममध्ये नसलेल्या खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला. त्यामुळं आता 2023 वर्ल्ड कपला समोर ठेवून जास्तीत जास्त युवा खेळाडूंना संघात स्थान दिले आहे.

वर्ल्ड कपमध्ये भारताची डोकेदुखी ठरलेला चौथ्या क्रमांकाचा प्रश्न सोडवण्यासाठी मनिष पांडेला संधी दिली आहे. मनिष पांडेला सातत्य राखता न आल्यानं त्याला आपले संघातले स्थान अद्याप निश्चित करता आलेले नाही. मात्र वेस्ट इंडिज विरोधात त्याची बॅट तळपल्यास भारताला चौथ्या क्रमांकाचा फलंदाज मिळेल.

34 वर्षीय केदार जाधवला 2019 वर्ल्ड कपमध्ये जास्त संधी मिळाल्या नाहीत. त्यामुळं स्वत:ला सिध्द करण्यासाठी केदार जाधवकडे ही शेवटची संधी असू शकते. केदारनं 65 सामन्यात 43.24च्या सरासरीनं 1254 धावा केल्या आहेत. केदार जाधव फेल झाल्यास शुभमन गीलला संघात स्थान मिळू शकते.

केएल राहुलनं वर्ल्ड कपमध्ये रोहितसोबत सलामीला फलंदाजी केली होती. एकदिवसीय क्रिकेटमध्ये राहुलचे प्रदर्शन चांगले असले तरी त्यानं 34 कसोटी सामन्यात केवळ 1905 धावा केल्या आहेत. त्यामुळं कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी न केल्यास त्याची जागा पृथ्वी शॉ घेऊ शकतो.

भारताचा यष्टीरक्षक ऋद्धिमान साहा 2018मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला होता. साहानं आतापर्यंत 32 कसोटी सामन्यात 1164 धावा केल्या आहेत. त्यामुळं वेस्ट इंडिज विरोधात चांगली कामगिरी न केल्यास केएस भारत आणि ऋषभ पंत यांना संधी मिळू शकते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 25, 2019 07:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading