VIDEO : बाप असावा तर असा! सामन्याआधी रोहितला आली लेकीची आठवण आणि...

VIDEO : बाप असावा तर असा! सामन्याआधी रोहितला आली लेकीची आठवण आणि...

लेकीची आठवण आल्यानंतर रोहितनं थेट ड्रेसिंग रूममधूनच तिच्याशी बोलायला सुरुवात केली.

  • Share this:

मुंबई, 12 डिसेंबर : वानखेडेवर झालेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात भारतानं 67 धावांनी विजय मिळवत मालिकाही आपल्या खिशात घातली. सामन्यात पहिल्या दोन शांत असलेल्या रोहित शर्माची बॅट अखेर तळपली. रोहितनं या सामन्यात 71 धावांची खेळी केली. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यानं 400 षटकार मारण्याची कामगिरीही केली. अशी अभुतपूर्व कामगिरी करणारा रोहित शर्मा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.

दरम्यान, या सामन्यात रोहितची खेळी चर्चेचा विषय ठरली असली तरी हिटमॅनसाठी खास होती ती त्याची लेक. रोहितची मुलगी समायरा वानखेडेवर मैदानावर आपल्या हजर होती. सामना सुरू होण्यापूर्वी रोहित शर्मा ड्रेसिंग रूममधून बाहेर आला आणि जवळच्या फॅमिली बॉक्समध्ये आपल्या मुलीचे मनोरंजन करण्यास सुरवात केली. नंतर मैदानात जाऊन रोहित शर्माने फलंदाजीद्वारे हजारो प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

वाचा-लेक जवळ येत नाही म्हणून रोहित शर्मानं लढवली शक्कल, नव्या अवतारात आला समोर

रोहित शर्मा वेस्ट इंडिजविरूद्ध तुफानी 71 धावांची खेळी करण्यापूर्वी ड्रेसिंग रूममधून बाहेर आला. यावेळी स्टॅण्डमध्ये असलेल्या आपल्या मुलीचे मनोरंजन करू लागला. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.रोहित शर्माचा आयपीएल संघ मुंबई इंडियन्सने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये मुंबई इंडियन्सने लिहिले आहे की, "स्टँडमध्ये रोहित शर्माशी कोण बोलत आहे? अंदाज – ती त्याची मुलगी." हा गोंडस व्हिडिओ एकदा तरी पाहा.

वाचा-रोहितला मिळाला नवा पार्टनर! ‘हा’ खेळाडू करणार वन-डेमध्ये पदार्पण

 

View this post on Instagram

 

Guess who is @rohitsharma45 talking to in the stands? . Hint: . #OneFamily #CricketMeriJaan #INDvWI

A post shared by Mumbai Indians (@mumbaiindians) on

वाचा-घरच्या मैदानावर रोहित @ 400! एका षटकारासह केला वर्ल्ड रेकॉर्ड

पहिल्या दोन सामन्यात अयशस्वी ठरल्यानंतर रोहित शर्मानं घरच्या मैदानावर जबरदस्त कामगिरी केली. रोहित शर्मा-राहुल यांनी 135 धावांची भागीदारी केली. यात रोहित शर्माने 34 चेंडूत 6 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 71 धावांचे तुफानी खेळी केली. यावेळी त्याची लकी चार्म मैदानात उपस्थित होती. दुसरीकडे सामन्याआधी रोहितनं मुलीसाठी क्लिन शेव्ह केल्याचेही सांगितले होते. टी-20नंतर भारत-वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार आहे. 15 डिसेंबरपासून या मालिकेला सुरुवात होणार असून पहिला सामना चेन्नई येथे खेळवला जाणार आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: December 12, 2019, 4:59 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading