अखेर भांडण मिटलं! विराटनं शेअर केला पण नेटकऱ्यांनी रोहितला केलं ट्रोल

अखेर भांडण मिटलं! विराटनं शेअर केला पण नेटकऱ्यांनी रोहितला केलं ट्रोल

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपआधी विराटनं शेअर केला रोहितसोबतचा फोटो.

  • Share this:

अँटिगुआ, 22 ऑगस्ट : आजपासून भारतीय संघाच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपला सुरुवात होणार आहे. भारत आज वेस्ट इंडिज विरोधात पहिला कसोटी सामना खेळणार आहे. दरम्यान याआधी टी-20 आणि एकदिवसीय मालिका आपल्या खिशात घातल्यानंतर भारतीय संघ कसोटी मालिकेत विजयासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये पहिल्या गुणासाठी उत्सुक आहे.

दरम्यान, वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये पराभव मिळाल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात वाद सुरू असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान विराटनं वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना होण्याआधी या सगळ्या अफवा असल्याचे सांगत, भांडण नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र तरी, या दोन्ही खेळाडूंमध्ये मैदानावर आणि मैदानाबाहेर दुरावा दिसत होता.

कसोटी सामन्याआधी झालेला सराव सामना ड्रॉ झाल्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडिजमध्ये मस्ती करताना दिसला. यावेळी विराटनं विंडीजच्या समुद्र किनाऱ्यावर संपूर्ण संघाचा मस्ती करतानाचा फोटो टाकला. या फोटोमध्ये इतर सदस्यांसोबत रोहित शर्माही सामील आहे. त्यामुळं चाहते हा फोटो पाहून खुश आहेत.

विराट कोहलीच्या संघासोबतच्या फोटोमध्ये रोहितची अनुपस्थिती या दोघांमध्ये अजूनही बिनसलं आहे याचे संकेत देत होते. अखेरत महिनाभर चाललेल्य़ा या चर्चांवर विराटनं रोहितसोबत फोटो टाकत, या गोष्टींवर पडदा टाकला आहे. कोहलीनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. त्यामुळं अखेर भांडण मिटलं असल्याचे चित्र दिसत आहे. आता विराटने रोहित फोटोमध्ये असलेला फोटो शेअर केला आहे. यानंतरही दोघांमध्ये मतभेद असल्याचंच म्हटलं जात आहे. दोघे एका फोटोत असले तरी विराट सर्वांच्या मधोमध असून रोहित शर्मा एका बाजूला आहे. त्याच्या शेजारी अजिंक्य रहाणे उभा आहे. या फोटोत केएल राहुल, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत, मयंक अग्रवाल हेसुद्धा आहेत.

मात्र रोहित शर्माच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. या फोटोमध्यो रोहित केएल राहुलच्या मागे लपला आहे, त्यामुळं आपलं पोट लपवण्यासाठी हा लपला आहे, असे काही चाहत्यांनी म्हटले आहे.

वेस्ट इंडिज वापरणार भारताविरुद्ध मजबूत अस्त्र

विंडीजशिवाय इंग्लंडमध्येसुद्धा ड्यूक चेंडूचा वापर केला जातो. भारतीय फलंदाजांना या चेंडूवर स्विंग गोलंदाजीचा सामना करणं अवघड जातं. या वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंड संघ विंडीज दौऱ्यावर गेला होता. तेव्हाही ड्यूक चेंडूचा वापर करण्यात आला. इंग्लंड जरी ड्यूक चेंडूने खेळत असले तरी विंडीजच्या या निर्णयाला त्यांनी विरोध केला होता. भारतीय गोलंदाजीच्या तुलनेत फलंदाजी कमकुवत आहे. कसोटीत विराट आणि चेतेश्वर पुजारा वगळले तर इतर फलंदाज मैदानावर टिकून धावा करतील हे ठामपणे सांगता येत नाही. अजिंक्य रहाणे फॉर्ममध्ये नाही. रोहित शर्मा कसोटीत धावा करण्यात अपयशी ठरला आहे. तर अद्याप केएल राहुल, ऋषभ पंत यांनी समाधानकारक कामगिरी केलेली नाही.

VIDEO : कार्यकर्त्याच्या आत्महत्येनंतर राज ठाकरे झाले भावूक, केलं हे आवाहन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 22, 2019 08:49 AM IST

ताज्या बातम्या