फक्त धोनीची नाही तर पंत घेणार 'या' फलंदाजाची सुध्दा जागा, सेहगानं केला खुलासा

विरेंद्र सेहवागनं धोनीची जागा ऋषभ पंत घेणार असे सांगितले.

News18 Lokmat | Updated On: Aug 23, 2019 07:51 PM IST

फक्त धोनीची नाही तर पंत घेणार 'या' फलंदाजाची सुध्दा जागा, सेहगानं केला खुलासा

मुंबई, 23 ऑगस्ट : भारतीय संघासाठी वर्ल्ड कपपासून कोणता फलंदाज, चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणार याच्या चर्चा सुरू आहेत. यातच आता भारताची माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं निवृत्ती घेण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळं त्याची जागा कोण घेणार याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान विरेंद्र सेहवागनं धोनीची जागा ऋषभ पंत घेणार असे सांगितले.

टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत विरेंद्र सेहवागनं, "ऋषभ पंत फक्त धोनीची जागा घेणार असे नाही तर, आणखी काही फलंदाजांच्या जागा तो घेऊ शकतो", असेही सांगितले. सेहवागनं, "पंत धोनीचा उत्तराधिकारी तर होणारच आहे पण तो टीम इंडियाचा सलामीचा फलंदाजही होऊ शकतो. पंतकडे क्षमता आहे की तो सलामीला फलंदाजीसाठी उतरू शकतो", असे सांगितले.

यावेळी बोलताना सेहवाग म्हणाला की,''मला वाटते ऋषभ पंत धोनीची जागा घेण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये स्वत: ला सिद्ध केले आहे आणि तो एकदिवसीय सामन्यातही असे करेल. पंतची धोनीची जागा घेण्यासारखा दुसरा कोणी नाही".

पंतला घ्यावी लागेल या गोष्टींची काळजी

सेहवागनं, "पंत शॉट मारताला त्यांची निवड करताना योग्य काळजी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी त्याला थोडा सराव करावा लागेल. जर त्यानं आपली शॉट खेळण्याची निवड योग्य केली तर, तो टीम इंडियात जास्त काळ खेळू शकतो", असे सांगितले.

Loading...

ऋषभ पंतच्या शॉटवर उपस्थित झाले अनेक प्रश्न

अलिकडच्या काळात ऋषभ पंतच्या शॉट निवडीवर बरेच प्रश्न उपस्थित झाले आहेत. विश्वचषकाच्या उपांत्य फेरी असो वा वेस्ट इंडीज विरूद्ध टी -20 आणि एकदिवसीय मालिका असो, पंतने अत्यंत खराब फटका मारून विकेट गमावली. सेहवाग याच गोष्टीला त्याची कमजोरी मानतो. पंत सध्या वेस्ट इंडिजविरूद्ध एक कसोटी मालिका खेळत आहे जिथे त्याला अँटिगा कसोटीत स्वत: ला सिद्ध करण्याची संधी आहे. तसेट, त्याने कसोटी फलंदाज म्हणून इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये शतके केली आहेत आणि म्हणूनच त्याला ऋद्धिमान साहापेक्षा प्राधान्य दिले जाते.

VIDEO: भाजप जिंकलं तरी मंत्रिमंडळ आमचंच, सुप्रिया सुळेंनी सांगितला 'हा' फॉर्म्युला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 23, 2019 06:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...