ऋषभ पंतचं करिअर धोक्यात, खराब कामगिरीमुळं 'या' तिघांना मिळणार संधी?

ऋषभ पंतचं करिअर धोक्यात, खराब कामगिरीमुळं 'या' तिघांना मिळणार संधी?

वेस्ट इंडिज विरोधात पंत बेजबाबदार शॉट मारत बाद झाला, त्यामुळं त्याचे संघातील स्थान धोक्यात आले आहे.

  • Share this:

त्रिनिदाद, 16 ऑगस्ट : वर्ल्ड कपमध्ये झालेल्या पराभवानंतर विराटसेनेनं वेस्ट इंडिजविरुद्ध टी20 पाठोपाठ वनडे मालिकाही भारताने जिंकली. मात्र, या सामन्यातही विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंतला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळं ऋषभ पंतच्या खेळीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कारण त्रिनिदादमध्ये झालेल्या तिसऱ्या सामन्यात पंत पहिल्याच चेंडूवर खातंही न उघडताच बाद झाला.

दरम्यान, तिसऱ्या सामन्यात वेस्ट इंडीजनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पावसामुळं सामना 35 षटकांचा खेळवण्यात आला. विंडीजनं 7 बाद 240 धावा केल्या. त्यानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला 35 षटकांत 255 धावांचे आव्हान मिळालं. भारताने हे आव्हान 32.3 षटकांतच 4 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. मात्र, या सामन्यातही ऋषभ बेजबाबदार शॉट खेळत बाद झाला. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही पंत 20 धावा करत बाद झाला होता. तिसऱ्या सामन्यात शिखर धवन बाद झाल्यानंतर क्रिझवर आलेल्या पंतनं पहिल्याच चेंडूवर मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न केला आणि बाद झाला. त्यामुळं पंतच्या या खेळीवर चाहत्यांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे.

चौथ्या क्रमांकावर पंत असफल

आतापर्यंत अनेकवेळा पंतनं त्याला मिळालेली संधी गमावली आहे. वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये, टी20 मालिकेत आणि दुसऱ्या सामन्यातही पंत चुकीच्या फटक्यामुळं बाद झाला. त्यानं मोक्याच्या क्षणी विकेट गमावली. पंतने गेल्या दोन्ही सामन्यात विकेट गमावल्यानंतर श्रेयस अय्यरनं जबरदस्त खेळी केली. मिळालेल्या संधीचा फायदा उठवत त्यानं दोन्ही सामन्यात अर्धशतकी खेळी केली.त्यामुळं आता पंतचे चौथ्या क्रमांकाचे स्थान धोक्यात आले आहे. त्यामुळं पंतचे स्थान घेण्यासाठी ही तीन फलंदाज सज्ज आहेत.

वाचा-‘पंत तू तर वन डे क्रिकेट खेळण्याच्या लायकीचा नाहीस!'

इशान किशन: धोनीच्याच राज्यातील आणि त्याच्याप्रमाणे झारखंडमधून क्रिकेटला सुरुवात करणारा इशान किशन या भारतीय संघासाठी दावेदार असू शकतो. 20 वर्षीय इशान केशननं प्रथम श्रेणी आणि आयपीएल स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. 2019च्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या इशान किशननं, आपल्या संघाला विजेतेपद मिळवून दिले. इशान धोनीसारखाच आक्रमक असून तो, कोणत्याही स्थानावर फलंदाजी करू शकतो. आयपीएलमध्ये त्यानं विकेटकीपर म्हणून स्वत:ला सिद्ध केले आहे. त्यामुळं धोनीच्या निवृत्तीनंतर संघात इशान किशनला जागा मिळू शकते.

संजु सॅमसन : एकदिवसीय क्रिकेटमध्ये संजु सॅमसनची निवड आतापर्यंत न झाल्यामुळं चाहते हैराण आहेत. आयपीएलमध्ये राजस्थानकडून खेळताना संजुनं चांगली कामगिरी केली आहे. मात्र, 24 वर्षीय संजुनं प्रथम श्रेणीत केवळ 36.81च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. भारताची कमकुवत बाजू असलेल्या चौथ्या क्रमांकाचा तो योग्य दावेदार होऊ शकतो. त्याचरोबर आयपीएलमध्ये विकेटकिपींग करणारा सॅमसन एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी योग्य ठरू शकतो.

वाचा-BCCIनं घेतला मोदी सरकारशी पंगा, टीम इंडियातील सदस्याला दिली माफी!

अंकुश बॅंस : अंकुश बॅंस भारतीय संघातील मोठे नाव नसले तरी, त्यानं अंडर-19 क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. 2014मध्ये अंडर-19मध्ये त्यानं यशस्वी अर्धशतकी खएळी केली. त्यानं आतापर्यंत 36 टी-20 सामने खेळले आहेत. यात 23.74च्या सरासरीनं 736 धावा केल्या आहेत. हिमाचल प्रदेशकडून क्रिकेट खेळणारा हा 23 वर्षीय क्रिकेटपटू भारतीय संघात ऋषभ पंतची जागा घेऊ शकतो.

वाचा-‘या’ क्रिकेटपटूच्या घरात आहे स्ट्रिप क्लब, पाहतो बिकिनी गर्ल्सचा पोल डान्स!

जोश, घोषणा आणि दरारा, अटारी बॉर्डरवर बीटिंग द रिट्रीटचा VIDEO पाहाच!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 15, 2019 09:27 PM IST

ताज्या बातम्या