मीच होणार धोनीचा खरा वारसदार! ऋषभ पंतनं मोडला सर्वात मोठा रेकॉर्ड

ऋषभ पंतनं तुफान फटकेबाजीसह 65 धावा करत आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये पहिलं अर्धशतक केलं.

News18 Lokmat | Updated On: Aug 8, 2019 08:43 AM IST

मीच होणार धोनीचा खरा वारसदार! ऋषभ पंतनं मोडला सर्वात मोठा रेकॉर्ड

भारताने विंडीजविरुद्ध तीन टी20 सामन्यांची मालिका 3-0 अशी जिंकली. शेवटच्या टी20 सामन्यात विंडीजने दिलेले 146 धावांचे आव्हान भारताने 19.1 षटकांत 3 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. या विजयात ऋषभ पंतचा वाटा मोलाचा होता.

वेस्ट इंडिज दौऱ्यावर महेंद्रसिंग धोनीनं विश्रांती घेतल्यामुळं ऋषभ पंतला संघात स्थान मिळाले. पहिल्या दोन सामन्यात पंत अपयशी ठरला होता. त्याला दोन सामन्यात 0 आणि 4 धावाच काढता आल्या होत्या.

तुफान फटकेबाजीसह 65 धावा करत आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये पहिलं अर्धशतक केलं. भारताच्या यष्टीरक्षकानं एका टी20 सामन्यात केलेल्या या सर्वाधिक धावा आहेत. त्यामुळं पंतनं धोनीचा सर्वात मोठा विक्रम मोडला आहे.

पंतच्या आधी धोनीच्या नावावर 2017मध्ये इंग्लंड विरोधात 56 धावा करण्याचा विक्रम होता. मात्र धोनीचा हा सर्वात मोठा विक्रम पंतनं तिसऱ्या टी-20 सामन्यात तोडला

पंतनं 65 धावा करत आपल्या नावावर दोन रेकॉर्ड केले आहे. 22 वर्षांचा होण्याआधी दोन अर्धशतकं लगावणारा ऋषभ हा एकमेव फलंदाज आहे. त्यामुळं त्याच्या या खेळीनं त्यांनं सर्वांचे लक्ष आपल्याकडे वळवले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: MS Dhoni
First Published: Aug 8, 2019 08:43 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...