IND vs WI : रोहितला मिळाला नवा पार्टनर! ‘हा’ खेळाडू करणार वन-डेमध्ये पदार्पण

IND vs WI : रोहितला मिळाला नवा पार्टनर! ‘हा’ खेळाडू करणार वन-डेमध्ये पदार्पण

भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध टी-20 मालिकेनंतर एकदिवसीय मालिकाही खेळणार आहे.

  • Share this:

मुंबई, 11 डिसेंबर : भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध टी-20 मालिकेनंतर एकदिवसीय मालिकाही खेळणार आहे. दरम्यान या मालिकेतून याआधी सलामीवीर शिखर धवननं माघार घेतली होती. त्यामुळं शिखर धवनची जागा विराटनं एका युवा खेळाडूला संधी दिली आहे. दुखापतीमुळे वेस्ट इंडिज दौऱ्यातून माघार घेतलेल्या शिखर धवनच्या जागी टी-20मध्ये संजू सॅमसनला संधी देण्यात आली होती. दरम्यान आता एकदिवसीय क्रिकेटमध्ये कसोटीमध्ये शानदार खेळी करणाऱ्या मयंक अग्रवालला एकदिवसीय संघात जागा मिळाली आहे.

बीसीसीआयनं बुधवारी शिखर धवन जखमी असल्यामुळं मयंक अग्रवालला एकदिवसीय संघात स्थान देण्यात असल्याचे सांगितले. भारत-वेस्ट इंडिज यांच्यात 15 डिसेंबरपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. याआधी मयंक अग्रवालला इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कप 2019ध्ये विजय शंकर जखमी झाल्यानंतर संघात जागा दिली होती. मात्र मयंक एकही सामना खेळू शकला नव्हता. त्यामुळं वेस्ट इंडिज विरोधात त्याला संधी मिळू शकते.

वाचा-याला म्हणतात जेंटलमॅन! मैदानात कोसळला फलंदाज, गोलंदाजाच्या हातात होता चेंडू पण..

शिखर धवनच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे

सैयद मुश्तल अली ट्रॉफी दरम्यान शिखर धवनला डाव्या गुडघ्यात दुखापत झाली होती. त्याच्या गुडघ्याला गंभीर जखम झाल्यामुळे तो काही काळ क्रिकेट खेळू शकणार नाही आहे. त्यामुळं त्याला टी -20 मालिकेतून वगळण्यात आले. शिखर धवनला टी -20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी निवड समितीत संघात स्थान देण्यात आले होते, पण आता दुखापतीमुळे गंभीर एकदिवसीय मालिका खेळू शकणार नसल्याचे दिसत आहे. रविवारी पहिला वनडे सामना खेळला जाणार आहे.

वाचा-टीम इंडियासाठी मुंबई धोक्याची! ‘या’ तीन मुंबईकरांवर असणार मदार

अशी असे एकदिवसीय मालिका

भारत-वेस्ट इंडिज यांच्याच तीन सामन्यांची टी-20 मालिका झाल्यानंतर लगेचच एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. यातील पहिला सामना 15 डिसेंबरला चेन्नई येथे तर, दुसरा सामना 18 तारखेला विशाखापट्टनम येथे आणि अंतिम सामना 22 डिसेंबर रोजी कटक येथे होणार आहे.

वाचा-VIDEO : अरेरे! निवृत्तीनंतर ‘छमिया’सोबत लग्नांमध्ये नाचतोय स्टार क्रिकेटपटू

असा आहे वनडेसाठी भारतीय संघ- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत (विकेटकीपर), शिवम दुबे, केदार जाधव, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चाहर, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 11, 2019 02:35 PM IST

ताज्या बातम्या