लग्नाआधी बहिणीनं शोधली दीपक चहरची मुलगी! VIDEO VIRAL

लग्नाआधी बहिणीनं शोधली दीपक चहरची मुलगी! VIDEO VIRAL

वेस्ट इंडिज विरोधात झालेल्या टी-20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात दीपकनं सामनावीराचा पुरस्कार मिळवला होता.

  • Share this:

नवी दिल्ली, 12 ऑगस्ट : टीम इंडिया युवा गोलंदाज दीपक चहरला वेस्ट इंडिज विरोधात झालेल्या टी-20 सामन्यात संधी मिळाली होती. शेवटच्या सामन्यात शानदार गोलंदाजी करत दीपकनं सामनावीराचा पुरस्कार पटकावला. या सामन्यात दीपकनं तीन ओव्हरमध्ये केवळ चार धावा देत तीन विकेट घेतल्या. याच बरोबर त्यानं आपल्या नावावर विक्रमाची नोंद केली. मात्र, या सगळ्यात दीपकचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ त्याची बहिण मालती चहर हिनं शेअर केला होता.

दीपकची बहिण मालती चहर हिनं आपल्या इन्स्टाग्रामवर एक मुलीचा व्हिडिओ शेअर केला आहे. यात ही मुलगी पायात हिल्स घालून नाचताना दिसत आहेत. हा व्हिडिओ शेअर करताना मालतीनं “दीपक तुझ्या, मुलीला मी शोधलं आहे” , असे लिहिले आहे.

मालती आणि दीपक यांच्यात सोशल मीडियावर नेहमीच मज्जा मस्करी सुरु असते. आयपीएलमध्ये दीपक खेळत असलेल्या चैन्नई सुपरकिंग्ज संघाला सपोर्ट करण्यासाठी मालती मैदानावर हजर असायची. मालतीनं शेअर केलेल्या या क्युट व्हिडिओत, “दीपकला आपल्या मुलीला नेहमीच हिल्य घालून फिरवायचे होते. त्यामुळं त्याची मुलगी मला मिळाला आहे”, असे कॅप्शन लिहिले आहे.

वाचा-भाऊ गाजवत आहेत क्रिकेटचं मैदान, बहिणीने केले सर्वांना घायाळ!

वाचा-आमच्याशी नडायचं नाही, विराटनं दिला 'हा' इशारा!

सोशल मीडियावर मालतीची चर्चा

मात्र सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती, मालतीच चहरची. मालती ही दीपक आणि राहुलची बहिण असून आयपीएलनंतर सोशल मीडियावर तिचे फोटो व्हायरल होऊ लागले. उत्तर प्रदेशमधील आग्रा येथे राहणारी मालती अभिनेत्री आणि मॉडेल आहे. एवढेच नाही तर, ती सॉफ्टवेअर इंजिनिअरही आहे. मालतीनं डाबर टूथपेस्ट सारख्या जाहिरातींमध्ये काम केले आहे. तसेच, 2017मध्ये मॅनीक्युअर नावाची तिची एक शॉर्ट फिल्मही रिलीज झाली होती. एवढेच नाही तर 2017मध्ये तिनं बॉलिवूडमध्येही पदार्पण केले होते.

वाचा-'दंगल गर्ल'च्या हाती भाजपचे कमळ! विधानसभेसाठी मिळणार तिकीट?

पाणी ओसरल्यानंतर राहिला गाळ, चिखल आणि प्राण्यांचे मृतदेह; पाहा डोळ्यांत अश्रू आणणारा VIDEO

First Published: Aug 12, 2019 05:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading