IPL 2020 Auction : विराटशी पंगा घेण्यासाठी केजरिक विल्यम्स खेळणार IPL, ‘हा’ संघ लावणार बोली

IPL 2020 Auction : विराटशी पंगा घेण्यासाठी केजरिक विल्यम्स खेळणार IPL, ‘हा’ संघ लावणार बोली

कोणता संघ लावणार केजरिक विल्यम्सवर बोली. IPLमध्ये दिसणार नोटबूक सेलिब्रेशन.

  • Share this:

मुंबई, 12 डिसेंबर : भारत-वेस्ट इंडिज टी-20 मालिकेत विराटनं शानदार फलंदाजी केली. मात्र या मालिकेत सर्वांत चर्चेचा विषय ठरला हो विराट आणि केजरिक विल्यम्स यांच्यातील पंगा. पहिल्या टी-20 सामन्यात 94 धावा करणाऱ्या विराटनं नोटबुक स्टाईलनं केजरिकचं तोंड बंद केले. तर, दुसऱ्या सामन्यात विजयानंतर त्यानं विराटची बोलती बंद केली. विराट आणि केजरिक यांनी शाब्दिक नाही तर सेलिब्रेशन स्टाईलवरून द्वंद्व गाजलं. आता पुन्हा एकदा विराटची बोलती बंद करण्यासाठी केजरिक एक वेगळा प्लॅन घेऊन येत आहे. वेस्ट इंडिजचा हा जलदगती गोलंदाज आयपीएलच्या आगामी हंगामाच्या लिलावात सहभागी झाला आहे.

आयपीएलच्य तेराव्या हंगामासाठी 19 डिसेंबरला सकाळी 10 वाजता कोलाकाता येथे लिलाव होणार आहे. या लिलावासाठी जगभरातील सर्वच खेळाडू इच्छूक आहेत. मात्र लिलावाआधीच 639 खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्याता आला आहे. त्यामुळं आयपीएलच्या लिलावात 332 खेळाडूंवर बोली लागणार आहे. यात केजरिक विल्यम्सचाही समावेश आहे.

वाचा-केएल राहुलची चांदी, रॅकिंगमध्ये रोहित-विराटपेक्षा ठरला सरस!

त्यामुळं आता आयपीएलमध्येही विल्यम्सच्या ट्रेडमार्क नोटबूक सेलिब्रेशन दिसू शकते. सध्या आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हन पंजाब संघाकडे सर्वात जास्त शिल्लक रक्कमही किंग्ज इलेव्हन पंजाब आणि कोलाकात नाईट रायडर्स या संघांकडे आहे. त्यामुळं हे दोन संघ लिलावात विल्यम्सवर बोली लावू शकतात. सध्या संघमालकांनी मिळून २४ खेळाडूंची यादी गव्हर्निंग काऊन्सिलकडे दिली आहे.

वाचा-IPL 2020 लिलावाआधीच 639 खेळाडूंचा पत्ता कट! 'हा' खेळाडू ठरणार महागडा

लिलावाआधी काही खेळाडूंची नावे शॉर्टलिस्ट करण्यात आली. यात 332 खेळाडूंची नावे आठही संघांना पाठवण्यात आली आहेत. लिलावासाठी एकूण 971 खेळाडू उत्सुक होते, मात्र त्यातील 639 नावे हटवण्यात आली आहेत. शॉर्ट लिस्ट करण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये 19 भारतीय असे आहेत, ज्यांनी एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. तर, 24 खेळाडू हे आयपीएलमध्येच पदार्पण करतील, यात सर्वात महागडा भारतीय खेळाडू आहे रॉबिन उथप्पा (Robin Uthappa). उथप्पाची बेस प्राईज आहे 1.5 कोटी, त्यामुळं उथप्पावर सर्वात जास्त बोली लागण्याची शक्यता आहे. गेल्या दोन हंगामात जयदेव उनाडकतची बेस प्राईज एक कोटी होती. दरम्यान, आयपीएल 2020मध्ये केवळ 73 खेळाडूंना विकत घेतले जाणार आहे. दरम्यान सकाळी 10 वाजता लिलावाच्या प्रक्रियेला सुरुवात होऊ शकते.

वाचा-विराट कोहलीसाठी आनंदाची बातमी! दोन महिन्यांनंतर फिट झाला स्टार खेळाडू

IPL संघांकडची शिल्लक रक्कम

1. किंग्स इलेव्हन पंजाब, 42.70 कोटी

2. कोलकाता नाइटरायडर्स, 35.65 कोटी

3. राजस्थान रॉयल्स, 28.90 कोटी

4. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, 27.90 कोटी

5. दिल्ली कॅपिटल्स, 27.85 कोटी

6. सनराजयर्स हैदराबाद, 17.00 कोटी

7. चेन्नई सुपरकिंग्स, 14.60 कोटी

8. मुंबई इंडियन्स, 13.05 कोटी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 12, 2019 07:06 PM IST

ताज्या बातम्या