Happy Birthday Ishant Sharma : एका मॅकॅनिकलच्या मुलानं जग जिंकले, प्रेरणादायी प्रवास वाचून व्हाल थक्क!

Happy Birthday Ishant Sharma : एका मॅकॅनिकलच्या मुलानं जग जिंकले, प्रेरणादायी प्रवास वाचून व्हाल थक्क!

भारतीय संघातील सर्वात उंच गोलंदाज म्हणून ओळख असणाऱ्या इशांत शर्माचा आज 31वा वाढदिवस साजरा करत आहे.

  • Share this:

जमैका, 02 सप्टेंबर : भारतीय संघातील सर्वात उंच गोलंदाज म्हणून ओळख असणाऱ्या इशांत शर्माचा आज 31वा वाढदिवस साजरा करत आहे. सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेल्या इशांतनं आपल्या गोलंदाजीनं नाही तर फलंदाजीने सुध्दा सगळ्यांना चकित केले आहे. मात्र रातोरात स्टार झालेल्या या गोलंदाजाचा प्रवासही प्रेरणादायी होता. वयाच्या 18व्या वर्षी टीम इंडियात पदार्पण केलेल्या इशांत शर्माला पहिल्याच सामन्यात यश आले असे नाही.

2 सप्टेंबर 1988मध्ये दिल्लीत जन्माला आलेल्या इशांतला 2007मध्ये टीम इंडियात खेळण्याची संधी मिळाली. जगातील वेगवान गोलंदाजांमध्ये गणल्या जाणाऱ्या इशांत शर्मानं 2007 मध्ये बांगलादेशविरुद्ध कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर अनेकदा संघात आत-बाहेर राहिलेल्या इशांतला पदार्पणाच्या आधी अचानक संघातून डच्चू मिळाला होता. मात्र सुरुवातीच्या काळात दिल्लीत क्रिकेट खेळत असताना इशांतला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता.

वाचा-पहिल्या सामन्याआधी अचानक डावललं, धोनीच्या नेतृत्वाखाली बदललं नशीब

इशांतचे बाबा विजय शर्मा हे एसी दुरुस्त करण्याचे काम करत असतं. त्यातही केवळ उन्हाळ्यात हे काम करत असल्यामुळं घरात बऱ्याच वेळा पैसे नसायचे. त्यामुळं 150 रुपये प्रतिदिन मिळावे यासाठी इशांत कोहलीसोबत ज्यूनिअर क्रिकेट खेळायचा. त्यामुळं पैशासाठी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केलेल्या इशांतनं क्रिकेटला आपले स्वप्न बनवले. एक वेळ असाही होता, जेव्हा इशांत शिक 200 रुपयांसाठी मुलांना क्रिकेटवायचा. दरम्यान पहिला सामना खेळण्याआधीच इशांत आपली किटबॅक विसरला, त्यावेळी जहीर खानचे शुज वापरून पहिल्यांदा मैदानात उतरला.

बाबांना पहिली भेट दिली रेनकोट

इशांतनं एका कार्यक्रमात सांगितले की परदेशात असताना एकदा बाबांना काय आणू असे विचारले असता त्यांनी रेनकोट आण असे उत्तर दिले. एवढेच नाही तर इशांत शर्मानं एकदा घेतलेल्या 42 हजार रुपयांच्या स्पिकरवरून त्यांला चांगलीच बोलणी ऐकावी लागली.

वाचा-राहुलने लाज काढली, नेटीझन्स म्हणाले याच्यापेक्षा इशांत शर्मा बरा!

पदार्पणातच मिळाला डच्चू

वयाच्या 18 व्या वर्षी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी त्याची संघात निवड झाली होती. दौऱ्यावर जाण्याची तयारी पूर्ण झाली असताना त्याला ऐनवेळी डच्चू देण्यात आला. यानंतर काही महिन्यांनी मे 2007 मध्ये त्याला पदार्पणाची संधी मिळाली. संघात स्थान टिकवणं त्याच्यासाठी आव्हानात्मक होतं. पदार्पणानंतर तब्बल 7 वर्षांनी इशांत शर्माचं नशिब बदललं. 2007 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेट आणि 2008 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी 20 मध्ये पदार्पण केलं होतं. आयपीएलमध्येही त्याची कारकिर्द चढ-उतारांनी भरलेली होती. आता त्यानं कसोटी क्रिकेटमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे.

वाचा-विंडीज दौरा संपताना विराटच्या कामगिरीवर पडला डाग!

धोनीच्या नेतृत्वामुळं बदललं नशीब

माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली 2014 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघ गेला होता. यात लॉर्ड्सवर भारतानं 295 धावांची खेळी केली होती. प्रत्युत्तरादाखल खेळताना इंग्लंडने 319 धावा केल्या. तर भारतानं दुसऱ्या डावात 342 धावा करून इंग्लंडला 319 धावांचे आव्हान दिलं. यावेळी इशांत शर्मानं 74 धावांत 7 गडी बाद करून भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. या कामगिरीच्या जोरावर भारतानं सामना 95 धावांनी जिंकला होता. लॉर्ड्सवर केलेल्या कामगिरीनंतर मात्र इशांत शर्माने संघात स्थान पक्कं केलं. कसोटीत स्थान निर्माण केलेल्या इशांत शर्मानं 2016मध्ये अखेरचा एकदिवसी सामना खेळला होता. तर ऑक्टोंबर 2013 मध्ये त्यानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा टी 20 सामना खेळला होता.

वाचा-पंतने मोडला धोनीचा मोठा विक्रम, ऑस्ट्रेलियाच्या गिलख्रिस्टशी बरोबरी!

पाहा पुण्यातील गणपतीचा थाट, मिरवणुकीची खास ड्रोन दृश्यं VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 2, 2019 05:01 PM IST

ताज्या बातम्या