विंडीजकडे विजयासाठी 160 ग्रॅमचं जादुई अस्र, टीम इंडियाला आहे धोका!

विंडीजकडे विजयासाठी 160 ग्रॅमचं जादुई अस्र, टीम इंडियाला आहे धोका!

विंडीजने याआधी कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या इंग्लंडला 160 ग्रॅमचं अस्त्र वापरून पराभूत केलं आहे.

  • Share this:

अँटिगुआ, 21 ऑगस्ट : टी20 आणि एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर टीम इंडियासमोर आता विंडीजविरुद्ध कसोटी मालिकेचं आव्हान आहे. वेस्ट इंडिजला कसोटीत पराभूत करणं कठीण आहे. विंडीजचा संघ बलाढ्य नसला तरी त्यांच्या बाजूने एक गोष्ट भारताला त्रासदायक ठरू शकते. त्याच्या जोरावरच विंडीजने इंग्लंडला 2-1 ने पराभूत केलं होतं. विंडीजचा संघ भारताविरुद्ध ड्यूक चेंडूचा वापर करण्याची शक्यता आहे. या चेंडूवर खेळताना भारतीय फलंदाज धडपडतात. याचा फायदा विंडीजला जास्त होऊ शकतो.

विंडीजशिवाय इंग्लंडमध्येसुद्धा ड्यूक चेंडूचा वापर केला जातो. भारतीय फलंदाजांना या चेंडूवर स्विंग गोलंदाजीचा सामना करणं अवघड जातं. या वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंड संघ विंडीज दौऱ्यावर गेला होता. तेव्हाही ड्यूक चेंडूचा वापर करण्यात आला. इंग्लंड जरी ड्यूक चेंडूने खेळत असले तरी विंडीजच्या या निर्णयाला त्यांनी विरोध केला होता.

विंडीजने इंग्लंडसारख्या बलाढ्य संघाला कसोटी मालिकेत 2-1 ने पराभूत केलं होतं. पहिल्या कसोटी सामन्यात विंडीजने तब्बल 381 धावांनी विजय मिळवला होता. तर दुसऱी कसोटी 10 गडी राखून जिंकली होती. पहिल्या कसोटीत एका डावात इंग्लंडचा संघ 77 धावांत गुंडाळला होता. तर दुसऱ्या कसोटीतील दोन्ही डावात 187 आणि 132 धावा केल्या होत्या.

विंडीजच्या वेगवान गोलंदाजांना ड्यूक चेंडू आणि उसळत्या खेळपट्ट्यांचा फायदा झाला. वेगवान गोलंदाज केमार रोचने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत सर्वाधिक 18 गडी बाद केले होते. त्यामुळं विंडीज त्याच रणनितीचा भारताविरुद्ध वापर करू शकते. अँटिगुआमध्ये उसळत्या खेळपट्ट्या आणि त्यावर ड्यूक चेंडूचा वापर करून भारतीय फलंदाजांची शिकार केली जाऊ शकते.

भारतीय गोलंदाजीच्या तुलनेत फलंदाजी कमकुवत आहे. कसोटीत विराट आणि चेतेश्वर पुजारा वगळले तर इतर फलंदाज मैदानावर टिकून धावा करतील हे ठामपणे सांगता येत नाही. अजिंक्य रहाणे फॉर्ममध्ये नाही. रोहित शर्मा कसोटीत धावा करण्यात अपयशी ठरला आहे. तर अद्याप केएल राहुल, ऋषभ पंत यांनी समाधानकारक कामगिरी केलेली नाही.

वाचा : सानियानं शेअर केला फोटो; युजर्सनी विचारलं, हा कसला ड्रेस घातलास?

भारताने ड्यूक चेंडूवर अखेरची कसोटी मालिका इंग्लंडमध्ये खेळली होती. त्यात विराटशिवाय इतर एकही फलंदाज धावा करू सकला नव्हता. विराटने 59 पेक्षा जास्त सरासरीने 593 धावा केल्या होत्या. यात त्याच्या दोन शतकांचा आणि तीन अर्धशतकांचा समावेश होता. तर केएल राहुलने 29, हनुमा विहारीनं 28 आणि पंतने 27 च्या सरासरीने धावा केल्या होत्या. चेतेश्वर पुजाराने 39 च्या सरासरीनं धावा काढल्या होत्या. विंडीजमधील परिस्थिती इंग्लंडसारखी नसली तरी ड्यूक चेंडू भारतासाठी डोकेदुखी ठरेल.

कपडे काढून दाखवू का? पुण्यात दारूड्या महिलेची पोलिसांनाच शिवीगाळ पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Aug 21, 2019 04:26 PM IST

ताज्या बातम्या