IND v WI 1st Test Day-2 : सर जडेजाची तुफान खेळी! टीम इंडिया 297 धावांवर ऑल आऊट

IND v WI 1st Test Day-2 : सर जडेजाची तुफान खेळी! टीम इंडिया 297 धावांवर ऑल आऊट

India vs West Indies : जडेजाच्या शानदान अर्धशतकाच्या जोरावर भारतानं 297 धावांचा आकडा पार केला.

  • Share this:

अँटिगुआ, 23 ऑगस्ट : विंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर मधल्या फळीनं भारताचा डाव सावरला. दुसऱ्या दिवशी भारतीय संघानं 297 धावांपर्यंत मजल मारली. यात जडेजानं 58 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. अखेर 98व्या ओव्हरमध्ये होल्डरच्या चेंडूवर जडेजा बाद झाला. दरम्यान 94व्या ओव्हरमध्ये जडेजानं 100 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं.

दुसऱ्या दिवसाची सुरुवात जडेजा आणि पंत यांनी केली. मात्र पंतचा जास्त काळ टिकाव लागला नाही. पंत 24 धावा करत बाद झाला. त्यानंतर जडेजा आणि इशांत शर्मा यांनी 60 धावांची भागिदारी केली, आणि भारताचा डाव सावरला. जडेजानं 94व्या ओव्हरमध्ये या डावातील पहिला षटकार लगावला.

तत्पूर्वी नाणेफेक जिंकून विंडीजने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार जेसन होल्डरचा हा निर्णय सार्थ ठरवत विंडीजच्या गोलंदाजांनी भारताची 3 बाद 25 अशी अवस्था केली होती. मयंक अग्रवाल 5 धावा, चेतेश्वर पुजारा 2 धावा आणि विराट कोहली 9 धावांवर बाद झाले.

आघाडीची फळी लवकर बाद झाल्यानंतर लोकेश राहुल आणि अजिंक्य रहाणेनं डाव सावरला. मात्र, राहुल 44 धावांवर बाद झाला. त्यानंतर रहाणेनं हनुमा विराहीला साथीला घेत पडझड थांबवली. हनुमा विहारी 32 धावांवर बाद झाला. त्यानंतर लगेच अजिंक्य रहाणेसुद्धा बाद झाला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताची धावसंख्या 203 होती. जडेजा आणि इशांत शर्मा यांनी भारताचा डाव सावरला.

वेस्ट इंडिजकडून केमार रोचनं सर्वात जास्त म्हणजे चार विकेट घेतल्या. तर, शेनॉन ग्रॅब्रीलनं तीन आणि रॉस्टन चेसनं दोन विकेट घेतल्या. केमार रॉचनं आघाडीच्या फलंदाजांवर दबाव टाकत भारतीय संघांची नामुष्की वाढवली.

अजिंक्य रहाणेची जबाबदार खेळी

सलमीचे फलंदाज अपयशी झाल्यानंतर रहाणेनं संघाचा डाव सावरत 81 धावा केल्या. मात्र त्याला आपले शतक पूर्ण करता आले नाही. दरम्यान रहाणेला याबाबत विचारले असता, "मी स्वार्थी नाही आहे, माझ्या शतकापेक्षा जास्त संघ महत्त्वाचा आहे. संघाला कठिण प्रसंगातून कसा बाहेर काढू शकता, हा एवढाच विचार माझ्या डोक्यात होता", असे सांगितले. रहाणे फलंदाजीसाठी मैदानात उतरला तेव्हा 25 धावांवर भारताच्या तीन विकेट गेल्या होत्या. मात्र, रहाणेनं संयमी खेळी करत संघाला 203 धावांपर्यंत घेऊन गेला. रहाणेनं 2017मध्ये श्रीलंकेविरोधात शेवटची शतकी खेळी केली होती. त्यामुळं त्याला शतकाची सर्वात जास्त गरज होती, मात्र तरी त्यानं कोणतेही बेजबाबदार शॉट न खेळता संघासाठी संयमी फलंदाजी केली.

SPECIAL REPORT: प्लॅटफॉर्म ते स्टुडिओ...'त्या' एका VIDEOने बदललं आयुष्य

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 23, 2019 09:18 PM IST

ताज्या बातम्या