'अनुष्कामुळेच मी सरळमार्गी झालो', विरुष्कानं पुन्हा एकदा दिले कपल गोल्स!

विराट-अनुष्का यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

  • Share this:

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या आपल्या संघासोबत वेस्ट इंडिज दौऱ्यावर कसोटी सामने खेळत आहे.

टी-20 आणि एकदिवसीय मालिकेत विजय मिळवल्यानंतर विराटसेना आता कसोटी मालिका आपल्या खिशात घालण्यासाठी सज्ज आहे.

दरम्यान, पहिल्या सामन्याआधी विराटनं आपली पत्नी अनुष्कासोबत क्वालिटी टाईम घालवला. विराट-अनुष्काचे समुद्रावरचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.

विरुष्का या नावानं प्रसिध्द असलेली विराट-अनुष्काची जोडी सगळ्यांसाठीच आदर्श आहे. सध्या अनुष्का विराटसोबत वेस्ट इंडिज दौऱ्यात सोबत आहे.

नुकत्याच एक मुलाखतीत विराटनं अनुष्कासाठी का खास आहे हे सांगितले. विराटनं दिग्गज फलंदाज व्हिव रिचर्ड्स यांना दिलेल्या मुलाखतीत आपल्या प्रेमाची पुन्हा एकदा कबुली दिली.

विराटनं अनुष्काबद्दल, "माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा आशिर्वाद मी अनुष्काशी लग्न करने समजतो. या खेळाबरोबरच आयुष्यात योग्य माणूस मिळणं गरजेच असतं", असे सांगत कौतुक केले.

तसेच, "अनुष्का स्वत: प्रोफेशनल आहे, त्यामुळं ती मला चांगली समजून घेते. अनुष्कामुळं मी मार्गाला लागलो. तिच्या बरोबर राहून मी खुप काही शिकलो आहे", असे विराटनं अनुष्काबद्दल सांगितले.

विराटनं आपल्यातील झालेल्या बदलांचे श्रेयही अनुष्काला दिले. "अनुष्कासोबत राहून मी एक गोष्ट शिकलो. मैदानाबाहेर तुम्ही चांगली कामं केली की, त्याचा चांगला परिणाम तुमच्या खेळावरही होता", असे विराटनं सांगितले.

दुसरीकडे अभिनेत्री अनुष्का शर्मा मागच्या बऱ्याच काळापासून बॉलिवूड पासून दूर आहे. मात्र ती सोशल मीडियावर सक्रिय आहे. ती नेहमीच ती सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर करत असते.

काही दिवसांपूर्वी अनुष्का शर्मानं तिच्या इन्स्टाग्रामवर एक बिकिनी फोटो शेअर केला आहे. या फोटोला तिनं ‘Sunkissed And Blessed’ असं कॅप्शन दिलं आहे.

अनुष्काच्या या फोटोवर विराट कोहली रोमँटिक झालेला दिसला. विराटनं या फोटोवर कमेंट करताना हार्ट आणि हार्ट आइज एमोजी पोस्ट केल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 23, 2019 05:18 PM IST

ताज्या बातम्या