IND v WI 1st Test Day-1: 'फक्त शतक करण्यासाठी खेळायला मी स्वार्थी नाही', रहाणेच्या उत्तराची जोरदार चर्चा

भारतानं वेस्ट इंडिज विरोधात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवसअखेर 6 बाद 203 धावांपर्यंत मजल मारली.

News18 Lokmat | Updated On: Aug 23, 2019 04:23 PM IST

IND v WI 1st Test Day-1: 'फक्त शतक करण्यासाठी खेळायला मी स्वार्थी नाही', रहाणेच्या उत्तराची जोरदार चर्चा

अँटिगुआ, 23 ऑगस्ट : भारतीय कसोटी संघाचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणेनं तब्बल दोन वर्षे झाली तरी, शतकी खेळी केलेली नाही. मात्र, रहाणेच्या याच अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतानं वेस्ट इंडिज विरोधात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवसअखेर 6 बाद 203 धावांपर्यंत मजल मारली. नाणेफेक जिंकून विंडीजने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार जेसन होल्डरचा हा निर्णय सार्थ ठरवत विंडीजच्या गोलंदाजांनी भारताची 3 बाद 25 अशी अवस्था केली. मयंक अग्रवाल 5 धावा, चेतेश्वर पुजारा 2 धावा आणि विराट कोहली 9 धावांवर बाद झाले.

सलमीचे फलंदाज अपयशी झाल्यानंतर रहाणेनं संघाचा डाव सावरत 81 धावा केल्या. मात्र त्याला आपले शतक पूर्ण करता आले नाही. दरम्यान रहाणेला याबाबत विचारले असता, "मी स्वार्थी नाही आहे, माझ्या शतकापेक्षा जास्त संघ महत्त्वाचा आहे. संघाला कठिण प्रसंगातून कसा बाहेर काढू शकता, हा एवढाच विचार माझ्या डोक्यात होता", असे सांगितले. रहाणे फलंदाजीसाठी मैदानात उतरला तेव्हा 25 धावांवर भारताच्या तीन विकेट गेल्या होत्या. मात्र, रहाणेनं संयमी खेळी करत संघाला 203 धावांपर्यंत घेऊन गेला. रहाणेनं 2017मध्ये श्रीलंकेविरोधात शेवटची शतकी खेळी केली होती. त्यामुळं त्याला शतकाची सर्वात जास्त गरज होती, मात्र तरी त्यानं कोणतेही बेजबाबदार शॉट न खेळता संघासाठी संयमी फलंदाजी केली.

Loading...

पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर शतकाबाबत विचारले असता, "जोपर्यंत मी संघासाठी योगदान देत आहे, तोपर्यंत मी आनंदी आहे. मी खेळतक असताना शतकाचा विचार करत होतो, मात्र अवघड परिस्थितीत संघासाठी खेळणे महत्त्वाचे होते", असे सांगितले. यावेळी रहाणेनं विहारीच्या खेळीचेही कौतुक केले. "विहारी हा असा खेळाडू आहे, जो संघासाठी खुप महत्त्वाचा आहे. त्यानं प्रथम श्रेणी क्रिकेट आणि रणजीमध्ये शानदार खेळी केली आहे. विहारी अडचणीच्या काळात योग्य पध्दतीनं फलंदाजी करतो", असे मत रहाणेनं व्यक्त केले.

भारताचा सलामीवीर मयंक अग्रवाल केमार रोचच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. तेव्हा मैजानावरील पंचांनी त्याला नाबाद ठरवले होते. विंडीजचा कर्णधार जेसन होल्डरनं डीआरएसचा निर्णय घेतला. तिसऱ्या पंचांनी रिव्ह्यू पाहिला तेव्हा चेंडू बॅटला लागून गेल्याचं स्पष्ट दिसलं. मयंक अग्रवालला फक्त 5 धावाच काढता आल्या. त्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहलीसुद्धा लवकर बाद झाले.

भारताची आघाडीची फळी लवकर बाद झाल्यानंतर लोकेश राहुल आणि अजिंक्य रहाणेनं डाव सावरला. मात्र, राहुल 44 धावांवर बाद झाला. त्यानंतर रहाणेनं हनुमा विराहीला साथीला घेत पडझड थांबवली. हनुमा विहारी 32 धावांवर बाद झाला. त्यानंतर लगेच अजिंक्य रहाणेसुद्धा बाद झाला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऋषभ पंत 20 धावांवर तर रविंद्र जडेजा 3 धावांवर खेळत होते.

'कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी...', चिमुकल्या गवळणीचा VIDEO VIRAL

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 23, 2019 03:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...