IND vs WI : एकेकाळी पैशांसाठी खेळायचा क्रिकेट, आता उडवतोय विंडीज फलंदाजांची झोप!

IND vs WI : एकेकाळी पैशांसाठी खेळायचा क्रिकेट, आता उडवतोय विंडीज फलंदाजांची झोप!

India vs West Indies : विडींजविरुद्धात झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय गोलंदाजांच्या वर्चस्वाच्या जोरावर भारतानं विजयी सुरुवात केली.

  • Share this:

फ्लोरिडा, 04 ऑगस्ट : विडींजविरुद्धात झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय गोलंदाजांच्या वर्चस्वाच्या जोरावर भारतानं विजयी सुरुवात केली. या सामन्यात भारतीय संघात पदार्पण करणाऱ्या नवदीप सैनीनं कमाल केली. आपल्या 4 ओव्हरमध्ये 17 धावा देत 3 विकेट घेतल्या. टीम इंडियाच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये सामिल होत नवदीप भारतासाठी खेळणारा 80वा खेळाडू ठरला आहे. आपल्या अनोख्या शैली आणि गतीच्या जोरावर नवदीपने सर्वांचे लक्ष ओढले.

प्रथम नाणेफेक जिंकून भारताचा कर्णधार विराट कोहलीने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. विराटचा निर्णय सार्थ ठरवत गोलंदाजांनी भेदक मारा करत त्यांचा निम्मा संघ 33 धावांत तंबूत धाडला. विंडीजला 20 षटकांत 9 बाद 95 धावांपर्यंत मजल मारता आली. भारताकडून सैनीने 3 तर भुवनेश्वर कुमारनं 2 विकेट घेतल्या.त्यांच्याशिवाय खलील अहमद, वॉशिंग्टन सुंदर आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. दरम्यान, विंडीजने दिलेलं 96 धावांचं आव्हान भारताने 17.2 षटकांत 6 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. तर, नवदीपनं पदापर्णातच सामनावीराचा पुरस्कार मिळवला.

वाचा- नवदीपचा विंडीजला दणका, गंभीर 2 दिग्गज माजी क्रिकेटपटूंवर भडकला!

दिल्लीचा नवदीप सर्वप्रथम सर्वांच्या नजरेत आला जेव्हा आयपीएलमध्ये विराटच्या रॉयल चॅलेंजर्च बंगळुरूकडून खेळत असताना पहिल्याच सामन्यातच त्यानं शेन वॉटसन सारख्या दिग्गज खेळाडूला टक्कर दिली. 151च्या वेगानं गोलंदाजी करणाऱ्या या खेळाडूनं आयपीएलमध्येच सर्वांचे लक्ष वेधले. दरम्यान रणजीमध्ये दिल्लीकडून खेळणारा सैनी हा मुळचा हरियाणाचा आहे. आपल्या करिअरच्या सुरुवातीला सैनी 200 रुपये प्रति सामन्याच्या हिशोबानं सामना खेळायचा. 2013पर्यंत तर सैनी लेदर बॉलने नाही तर चक्क टेनिस बॉलनं सराव करायचा. त्यामुळं त्याचा हा प्रवास पाहता, भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी सैनीला खडतर प्रयत्न करावे लागले.

वाचा-INDvsWI T20 : भारताचा विंडीजवर 4 गडी राखून विजय

कसोटी मालिकेतून केले होते पदार्पण

सैनीनं 2018मध्ये अफगाणिस्तान विरोधात झालेल्या कसोटी सामन्यात पदार्पण केले होते. त्यावेळी गंभीरनं सैनीच्या गोलंदाजीची तारिफ केली होती. यावेळी गंभीरनं, हा खेळाडू टीम इंडियात नक्की जागा मिळणारा असे भाकित केले होते.

गौतम गंभीर ठरला गुरू

रणजी स्पर्धेत दिल्ली संघाकडून खेळणाऱ्या सैनीची माजी कर्णधार गौतम गंभीरनं तारिफ केली होती. 2013-14मध्ये रणजी संघासाठी निवड झाली होती. दरम्यान 2017-18 दिल्लीला अंतिम फेरीत पोहचवण्यासाठी सैनीनं महत्त्वाची भूमिका होती. 8 सामन्यात त्यानं 34 विकेट घेतल्या होत्या.

वाचा- INDvsWI : पंतचा 'धोनी अवतार', विराटनं केलं कौतुक

VIDEO: मुंबईच्या रेल्वे स्टेशनचा झाला धबधबा, प्रवाशांचे प्रचंड हाल

Published by: Akshay Shitole
First published: August 4, 2019, 9:12 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading