India vs West Indies : असं फक्त हिटमॅन रोहितचं करू शकतो, एका फोटोत दिसले तब्बल 600 षटकार!

India vs West Indies : असं फक्त हिटमॅन रोहितचं करू शकतो, एका फोटोत दिसले तब्बल 600 षटकार!

India Vs West Indies : भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील टी-20 मालिकेनंतर आता एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे.

  • Share this:

गयाना, 08 ऑगस्ट : भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील टी-20 मालिकेनंतर आता एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. याआधी भारतीय संघानं टी-20 सामन्यात आपले वर्चस्व गाजवले होते, त्यामुळं वन-डे मालिकेतही अशीच कामगिरी करण्यास विराटसेना सज्ज आहे. पहिल्या दोन्ही टी-20 सामन्यात रोहित शर्मानं शानदार फलंदाजी केली, दरम्यान तिसऱ्या सामन्यात त्याला विश्रांती देण्यात आली. रोहितनं षटकार आणि चौकारांच्या मदतीनं चांगली फलंदाजी केली.

वर्ल्ड कप 2019नंतर रोहित शर्मा जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्यामुळं वेस्ट इंडिज विरोधात होणाऱ्या एकदिवसीय सामन्यातही त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा आहे. दरम्यान पहिल्या सामन्याआधी रोहितनं एक फोटो ट्वीट केला. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तब्बल 900 षटकार दिसत आहेत. हा फोटो आहे, रोहित शर्मा आणि ख्रिस गेल यांचा.

वाचा-Global T20 League : सिक्सर किंग युवराज सिंगची फसवणूक!

रोहित शर्मानं वेस्ट इंडिजचा सलामीचा फलंदाज ख्रिस गेल याच्यासोबत एक फोटो शेअर केला. या दोघांचाही जर्सी क्रमांक 45 आहे. या दोन्ही धमाकेदार फलंदाजांनी एकत्रतरित्या 900 षटकार मारले आहेत. आपली शेवटची एकदिवसीय मालिके खेळणाऱ्या गेलनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 529 षटकार लगावले आहेत. तर, रोहित शर्माच्या नावावर 371 षटकार आहेत. ख्रिस गेल हा सर्वात जास्त षटकार मारणारा फलंदाज आहे.

वाचा-वन डेतही विराटसेना राखणार का वर्चस्व? 'या' चॅनलवर पाहू शकता लाईव्ह मॅच

येथे पाहू शकता India vs West Indies यांच्यातील टी-20 सामना

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात होणारा टी-20 सामना सोनी नेटवर्कवर लाईव्ह पाहू शकता. (Sony Network) याशिवाय Sony Ten SD/HD आणि Sony Ten 3 SD/HD वर पाहू शकता. हा सामना आठ वाजता सुरु होणार आहे.

वाचा-मीच होणार धोनीचा खरा वारसदार! ऋषभ पंतनं मोडला सर्वात मोठा रेकॉर्ड

पतीसमोरच पत्नीला लाठ्या-काठ्याने मारहाण, VIDEO व्हायरल

Published by: Akshay Shitole
First published: August 8, 2019, 4:14 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading