India vs West Indies : चौथ्या क्रमांकाचा तिढा कायम! अशी असेल भारताची प्लेयिंग इलेव्हन

India vs West Indies : चौथ्या क्रमांकाचा तिढा कायम! अशी असेल भारताची प्लेयिंग इलेव्हन

India vs West Indies : भारताकडे चौथ्या क्रमांकावर कोणता फलंदाज फलंदाजी करणार हे अद्यापही निश्चित नाही.

  • Share this:

गयाना, 08 ऑगस्ट : भारतीय संघाने टी-20 मालिकेत आपले वर्चस्व गाजवल्यानंतर वेस्ट इंडिज विरोधात एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज आहे. वर्ल्ड कपमध्ये झालेल्या पराभवानंतर आज पहिल्यांदा एकदिवसीय सामना खएळणार आहे. हा सामना प्रोव्हीडन्स स्टेडियम, गयाना येथे भारतीय वेळेनुसार सायंकाळी सात वाजता खेळवण्यात येणार आहे. मात्र या सामन्यात विराट कोणाला संधी देणार हे पाहणे जास्त महत्त्वाचे असणार आहे.

वर्ल्ड कपमध्ये पराभव स्विकारल्यानंतर भारतीय संघ पहिल्यांदाच मैदानावर उतरणार आहे. दरम्यान वर्ल्ड कपमध्ये भारतासाठी चिंतेचा विषय होता तो म्हणजे मधली फळी. भारताकडे चौथ्या क्रमांकावर कोणता फलंदाज फलंदाजी करणार हे अद्यापही निश्चित नाही. मात्र, जर टी-20मधली ऋषभ पंतची फलंदाजी पाहता, तो चौथ्या क्रमांकाचा फलंदाज बनू शकतो.

वाचा-असं फक्त हिटमॅन रोहितचं करू शकतो, एका फोटोत दिसले तब्बल 600 षटकार!

कशी असेल भारताची प्लेयिंग इलेव्हन

टी-20मधली फलंदाजी पाहता रोहित शर्मा सलामीला कायम राहणार आहे. मात्र, शिखर धवन की केएल राहुल कोणाला संधी मिळते हे पाहावे लागणार आहे. कारण टी-20 सामन्यात शिखर धवनला चांगली फलंदाजी करता आली नाही. तर, तिसऱ्या क्रमांकावर कर्णधार विराट कोहली उतरू शकते. त्यामुळं चौथ्या क्रमांकावर ऋषभ पंत, मनीष पांडे किंवा श्रेयस अय्यर या तीन फलंदाजांपैकी एकाला संधी मिळू शकते.

वाचा-वन डेतही विराटसेना राखणार का वर्चस्व? 'या' चॅनलवर पाहू शकता लाईव्ह मॅच

मनीष पांडे की श्रेयस अय्यर कोणाला मिळणार संधी

श्रेयस अय्यरला एकाही टी-20 सामन्यात संधी मिळाली नाही. त्यामुळं एकदिवसीय सामन्यात त्याला संधी मिळण्याची शक्यता आहे. जर, चौथ्या क्रमांकावर ऋषभ पंत आल्यास मनीष पांडे पाचव्या क्रमांकावर येऊ शकतो. त्यानंतर केदार जाधव आणि श्रेयस अय्यर यांच्यापैकी एकाला सहाव्या क्रमांकावर संधी मिळेल.

असा असेल भारताचा संभाव्य संघ- रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, ऋषभ पंत, मनीष पांडे, केदार जाधव/श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, नवदीप सैनी आणि मोहम्मद शमी

वाचा-Global T20 League : सिक्सर किंग युवराज सिंगची फसवणूक!

हॉस्पिटलमधून रुग्णांना रेस्क्यू करतानाचा थरार LIVE VIDEO

First published: August 8, 2019, 5:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading