India vs West Indies : वन डे सामन्यातही पावसाचा खोडा!

India vs West Indies : भारतीय संघाने टी-20 मालिकेत आपले वर्चस्व गाजवल्यानंतर आता एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 8, 2019 10:05 PM IST

India vs West Indies : वन डे सामन्यातही पावसाचा खोडा!

गयाना, 08 ऑगस्ट : भारतीय संघाने टी-20 मालिकेत आपले वर्चस्व गाजवल्यानंतर वेस्ट इंडिज विरोधात एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज आहे. मात्र मुसळधार पावसामुळं टॉसला विलंब झाला होता. मात्र आता पाऊस थांबवल्यामुळं सामना 40 ओव्हरचा होणार आहे. दरम्यान भारतानं टॉस जिंकत घेतला गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

वर्ल्ड कपमध्ये मिळालेल्या पराभवानंतर आज भारत वेस्ट इंडिज विरोधात पहिला एकदिवसीय मालिका सामना खेळणार आहे. त्यामुळं विराटसेनेकडे चांगली कामगिरी तर वर्ल्ड कपचा ढाग पूसण्याची संधी आहे. दुसरीकडे वेस्ट इंडिजसाठी ही मालिका महत्त्वाची असणार आहे. कारण, वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलची ही अखेरची एकदिवसीय मालिका असणार आहे. त्यामुळं दोन्ही संघ पहिला सामना जिंकण्यासाठी उत्सुक आहेत. पावसाचा जोर सध्या वाढला असला तरी, सामना कधी सुरु होणार याबाबत माहिती मिळालेली नाही.

पंतकडून मोठ्या खेळीची अपेक्षा

वेस्ट इंडिज विरोधात झालेल्या टी-20 सामन्यात पहिल्या दोन सामन्यात पंत अपयशी ठरला होता. त्याला दोन सामन्यात 0 आणि 4 धावाच काढता आल्या होत्या. तिसऱ्या सामन्यात मात्र त्यानं तुफान फटकेबाजीसह 65 धावा करत आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये पहिलं अर्धशतक केलं. भारताच्या यष्टीरक्षकानं एका टी20 सामन्यात केलेल्या या सर्वाधिक धावा आहेत. ऋषभ पंतच्या या खेळीच्या जोरावर भारतानं क्लिन स्वीप देत ही मालिका आपल्या खिशात घातली.

वाचा-असं फक्त हिटमॅन रोहितचं करू शकतो, एका फोटोत दिसले तब्बल 600 षटकार!

Loading...

विराटकडे मोठे रेकॉर्ड तोडण्याची संधी

एकदिवसीय क्रिकेट नेहमीच आपला दबदबा राखणारा कोहली आता टी-20 सोबतच एकदिवसीय मालिकेतही वेस्ट इंडिजला क्लिन स्वीप देण्याच्या तयारीत आहे. यासोबतच विराटकडे एक खास रेकॉर्ड आपल्या नावावर करण्याची संधी आहे. वेस्ट इंडिज विरोधात चांगली फलंदाजी करण्याचा इतिहास विराटच्या नावावर आहे. त्यानं 33 सामन्यात 70.81च्या सरासरीनं 1912 धावा केल्या आहेत. वर्ल्ड कपमध्ये विराटला एकही शतक लगावता आले नाही, त्यामुळे वेस्ट इंडिज विरोधात विराट ही कामगिरी करू शकतो.

वाचा-वन डेतही विराटसेना राखणार का वर्चस्व? 'या' चॅनलवर पाहू शकता लाईव्ह मॅच

भारताचा संघ- रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, केदार जाधव, रवींद्र जाधव, भुवनेश्वकर कुमार, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, खलील अहमद.

वाचा-Global T20 League : सिक्सर किंग युवराज सिंगची फसवणूक!

हॉस्पिटलमधून रुग्णांना रेस्क्यू करतानाचा थरार LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 8, 2019 08:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...