India vs West Indies : वन डेतही विराटसेना राखणार का वर्चस्व? 'या' चॅनलवर पाहू शकता लाईव्ह मॅच

India vs West Indies : वन डेतही विराटसेना राखणार का वर्चस्व? 'या' चॅनलवर पाहू शकता लाईव्ह मॅच

India vs West Indies : वर्ल्ड कपमध्ये झालेल्या पराभवानंतर आज पहिल्यांदा भारतीय संघ एकदिवसीय सामना खेळणार आहे.

  • Share this:

गयाना, 08 ऑगस्ट : भारतीय संघाने टी-20 मालिकेच आपले वर्चस्व गाजवल्यानंतर वेस्ट इंडिज विरोधात एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज आहे. वर्ल्ड कपमध्ये झालेल्या पराभवानंतर आज पहिल्यांदा एकदिवसीय सामना खेळणार आहे. हा सामना प्रोव्हीडन्स स्टेडियम, गयाना येथे भारतीय वेळेनुसार सायंकाळी सात वाजता खेळवण्यात येणार आहे.

दरम्यान, या मालिकेत केदार जाधव, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी हे परतणार आहेत. पण, अजूनही चौथ्या क्रमांकावर कोण फलंदाजी करणार हा प्रश्न कायम आहे. त्यामुळं विराट कोहली कोणाला संधी देणार, हे पाहावे लागणार आहे. मुंबईकर श्रेयस अय्यरला ट्वेंटी-20 मालिकेत संधी मिळाली नव्हती, पण त्याला वन डे संघात स्थान मिळू शकते. दुसरीकडे वेस्ट इंडिजसाठी ही मालिका महत्त्वाची असणार आहे. कारण, वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलची ही अखेरची एकदिवसीय मालिका असणार आहे.

वाचा-Global T20 League : सिक्सर किंग युवराज सिंगची फसवणूक!

येथे पाहू शकता India vs West Indies यांच्यातील सामना

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात होणारा टी-20 सामना सोनी नेटवर्कवर लाईव्ह पाहू शकता. (Sony Network) याशिवाय Sony Ten SD/HD आणि Sony Ten 3 SD/HD वर पाहू शकता. हा सामना आठ वाजता सुरु होणार आहे.

वाचा-मीच होणार धोनीचा खरा वारसदार! ऋषभ पंतनं मोडला सर्वात मोठा रेकॉर्ड

भारतीय संघ - विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, के.एल. राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, नवदीप सैनी

वेस्ट इंडिजचा संघ : जॉन कॅम्बेल, एव्हीन लुईस, शिमरोन हेटमायर, निकोलस पुरन, रोस्टोन चेस, फॅबियन अॅलन, कार्लोस ब्रॅथवेट, किमो पॉल, ख्रिस गेल, शेल्डन कॉट्रेल, ओशाने थॉमस, शे होप, जेसन होल्डर (कर्णधार) केमार रोच.

वाचा- विराटपेक्षा स्मिथ वरचढ? पाहा आकडेवारी काय सांगते

पतीसमोरच पत्नीला लाठ्या-काठ्याने मारहाण, VIDEO व्हायरल

Published by: Akshay Shitole
First published: August 8, 2019, 3:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading