Home /News /sport /

IND vs WI : वेस्ट इंडिज सीरिजसाठी वेळापत्रकात बदल, आता एकाच ठिकाणी दोन सामने!

IND vs WI : वेस्ट इंडिज सीरिजसाठी वेळापत्रकात बदल, आता एकाच ठिकाणी दोन सामने!

वेस्ट इंडिजची टीम पुढच्या महिन्यात भारत दौऱ्यावर (India vs West Indies) येणार आहे. या दौऱ्यात एकूण 6 मर्यादित ओव्हरचे सामने खेळवण्यात येणार आहेत. पण कोरोना रुग्णसंख्या (Coronavirus) वाढल्याने बीसीसीआयसमोरच्या (BCCI) अडचणी वाढल्या आहेत.

पुढे वाचा ...
    मुंबई, 15 जानेवारी : वेस्ट इंडिजची टीम पुढच्या महिन्यात भारत दौऱ्यावर (India vs West Indies) येणार आहे. या दौऱ्यात एकूण 6 मर्यादित ओव्हरचे सामने खेळवण्यात येणार आहेत. पण कोरोना रुग्णसंख्या (Coronavirus) वाढल्याने बीसीसीआयसमोरच्या (BCCI) अडचणी वाढल्या आहेत, त्यामुळे आता एकाच ठिकाणी वनडे सीरिजच्या दोन मॅचचं आयोजन व्हायची शक्यता निर्माण झाली आहे. महामारीमध्ये वेस्ट इंडिजच्या टीमने भारताचा दौरा केला तर वनडे सीरिजच्या 2 मॅच इडन गार्डनवर होऊ शकतात. याआधीच्या वेळापत्रकानुसार इडन गार्डनमध्ये 12 फेब्रुवारीला एकच मॅच होणार होती. टेलीग्राफने दिलेल्या वृत्तानुसार अहमदाबाद पहिल्या वनडे मॅचचं आयोजन करणार आहे, तर 9 आणि 12 फेब्रुवारीला होणाऱ्या दोन वनडे इडन गार्डनवर होतील. याआधी इडन गार्डनवर मागची आंतरराष्ट्रीय मॅच नोव्हेंबर 2021 मध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यातली तिसरी टी-20 मॅच होती. भारतीय टीम सध्या दक्षिण आफ्रिकेत आहे. तिकडे भारताने टेस्ट सीरिज 2-1 ने गमावली आहे. आता 19 जानेवारीपासून 3 वनडे मॅचच्या सीरिजला सुरूवात होणार आहे. 21 तारखेला दुसरी तर 23 जानेवारीला तिसरी वनडे होणार आहे. 6 ऐवजी 3 ठिकाणी होणार सगळ्या मॅच भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 3 वनडे आणि 3 टी-20 मॅचची सीरिज होणार आहे. दोन्ही टीममध्ये पहिले वनडे सीरिज होणार आहे, यानंतर टी-20 सीरिज खेळवली जाईल. वेळापत्रकानुसार 9 फेब्रुवारीला होणारी दुसरी वनडे जयपूरला होणार होती, पण ही वनडे आता कोलकात्यामध्ये होऊ शकते. यानंतर कटक, विशाखापट्टणम आणि तिरुवनंतपूरममध्ये 15 ते 20 फेब्रुवारीदरम्यान 3 टी-20 मॅचची सीरिज होणार होती, पण कोरोना रुग्ण वाढल्यामुळे प्रवास कमी करण्याच्या दृष्टीने 6 मॅचचं आयोजन 6 ऐवजी 3 ठिकाणी होऊ शकतं. वेस्ट इंडिजची टीम 1 फेब्रुवारीला अहमदाबादला पोहोचणार आहे, यानंतर ते 3 दिवस आयसोलेशनमध्ये राहतील.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Team india, West indies

    पुढील बातम्या