भारत-वेस्ट इंडीज सलामीचा सामना पावसामुळे रद्द

भारत-वेस्ट इंडीज सलामीचा सामना पावसामुळे रद्द

भारत विरूद्ध वेस्टइंडीजमध्ये पाच वनडे सामन्यांपैकी पहिल्या वनडे सामन्यावर पावसाने पाणी फेरलं.

  • Share this:

24 जून : भारत विरूद्ध वेस्टइंडीजमध्ये  पाच वनडे सामन्यांपैकी पहिल्या वनडे सामन्यावर पावसाने पाणी फेरलं. सततच्या पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला.

क्वींस पार्क ओवल मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यामध्ये ज्यावेळी पावसाने हजेरी लावली त्यावेळी भारताने फलंदाजी करताना 39.2 ओव्हरमध्ये 3 विकेट 199 रन्स बनवले. महेंद्र सिंग धोनीने 9 तर कर्णधार विराट कोहलीने 32 रन्स बनवले.

त्यानंतर दोन वेळा सामना सुरू होण्याची शक्यता होती पण पावसाने थोडावेळ थांबून पुन्हा हजेरी लावल्याने सामना रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्यानंतर सामना 26 षटकांचा करण्यात आला होता आणि वेस्ट इंडिजला 194 धावाच लक्ष्य मिळाले परंतू सामनाला सुरुवात होण्याआधीच पावसाने पुन्हा हजेरी लावली.

याआधी वेस्टइंडीजने टॉस जिंकून भारताला फलंदाजीसाठी आमंत्रित केल. शिखर धवन (87) आणि अजिंक्य रहाणेनी(62) भारताला एक चांगली सुरुवात करून दिली.  शिखर धवन आणि अजिंक्य रहाणेच्या जोडीने 25 ओवरमध्ये 132 रन बनवले. लेगस्पिनर देवेंद्र बिशुने  शिखर धवनचा डाव संपवला. पण त्यानंतर पावसाने हजेरी लावून सामना संपवला.

First published: June 24, 2017, 1:55 PM IST

ताज्या बातम्या