विराटला मोठा झटका, निर्णायक तिसऱ्या सामन्याआधी बाहेर पडला स्टार खेळाडू

विराटला मोठा झटका, निर्णायक तिसऱ्या सामन्याआधी बाहेर पडला स्टार खेळाडू

भारत-वेस्ट इंडिज यांच्यात रविवारी तिसरा निर्णायक एकदिवसीय सामना होणार आहे.

  • Share this:

कटक, 19 डिसेंबर : भारत-वेस्ट इंडिज यांच्यात रविवारी तिसरा निर्णायक एकदिवसीय सामना होणार आहे. मात्र या सामन्याआधी विराटला मोठा फटका बसला आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत भारतानं दुसरा सामना जिंकत या मालिकेत बरोबरी केली. त्यामुळं तिसरा सामना निर्णायक असणार आहे. मात्र या सामन्याआधीच भारताचा जलद गोलंदाज दुखापतीमुळं बाहेर पडला आहे.

वेगवान गोलंदाज दीपक चहरला दुखापतीमुळे वेस्ट इंडीजविरुद्धच्या वनडे मालिकेमधून बाहेर पडावे लागले आहे. त्यामुळं दीपकच्या जागी नवदीप सैनीचा संघात समावेश करण्यात आला आहे. याआधी शिखर धवन आणि भुवनेश्वर कुमार हेदेखील दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर गेले आहेत. धवनची जागा मयंक अग्रवाल आणि भुवनेश्वरच्या जागी शार्दुल ठाकूरला संधी मिळाली.

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात तीन सामन्यांच्या मालिकेत दोन सामने झाले आहेत. यात पहिला सामना विंडीजने 8 गडी राखून जिंकला तर दुसरा सामना टीम इंडियाने 107 धावांनी जिंकला. मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. शेवटचा सामना 22 डिसेंबर रोजी कटक येथे खेळला जाईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 19, 2019 03:06 PM IST

ताज्या बातम्या