तारीख ठरली! वेस्ट इंडिज दौऱ्यातच टीम इंडियाला मिळणार नवा कोच

तारीख ठरली! वेस्ट इंडिज दौऱ्यातच टीम इंडियाला मिळणार नवा कोच

कपिल देव यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आलेली समिती लवकरच टीम इंडियासाठी प्रशिक्षक शोधणार आहे.

  • Share this:

मुंबई, 05 ऑगस्ट : भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आलेली समिती लवकरच टीम इंडियासाठी प्रशिक्षक शोधणार आहे. यासाठी आता तारीख निश्चित झाली आहे, बीसीसीआयच्या प्रशासक समितीनं सोमवारी याबाबत माहिती दिली. या समितीत कपिल देव यांच्यासोबत अंशुमन गायकवाड आणि माजी महिला कर्णधार शांता रंगास्वामी यांचाही समावेश करण्यात आला आहे.

ICC Cricket World Cupमध्ये भारतीय संघाला अपयश मिळाल्यानंतर BCCIने टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफसाठी नव्याने अर्ज मागवले. त्यामुळं लवकरच प्रशिक्षक रवी शास्त्री यांना नारळ मिळणार आहे. दरम्यान प्रशिक्षकासाठी बीसीसीआयनं अर्ज करणाऱ्यांचे वय हे 60 पेक्षा कमी असावे आणि त्या उमेदवाराला किमान 2 वर्षांचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव अशी अट ठेवण्यात आली आहे.

कपिल देव यांच्या समितीचा निर्णय अंतिम

प्रशासकिय समितीनं दिलेल्या माहितीत, टीम इंडियाच्या प्रशिक्षकाच्या नियुक्तीसाठी तारीख ठरली आहे असे सांगितले. तसेच, या कपिल देव यांच्या समितीनं घेतलेला निर्णय अंतिम असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळं 15 ऑगस्टच्या आसपास टीम इंडियाला नवा प्रशिक्षक मिळू शकतो.

वाचा-IND vs WI : विराटनं सांगितली टीम इंडियाच्या कोचसाठी पहिली पसंती!

बीसीसीआयच्या निवडणूकांआधी होणार निर्णय

22 ऑक्टोबर रोजी बीसीसीआयच्या निवडणूका होणार आहेत.या 26 राज्य लोढाच्या नियमांचे पालन करत आहेत. त्यामुळं प्रत्येक राज्यात एक अधिकारी तैनात केला जाणार आहे. या सगळ्याचा विचार करता ऑगस्टमध्येच टीम इंडियाच्या प्रशिक्षकाचा प्रश्न मार्गी लावला जाऊ शकतो.

वाचा-भारतीय संघाचा कोच निवडण्यासाठी 'या' दिग्गजांची टीम सज्ज!

वेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत कोचिंग स्टाफचा कार्य़काळ

सध्या कार्यरत असलेल्या भारताच्या कोचिंग स्टाफचा कार्य़काळ हा वेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत म्हणजेच 45 दिवस वाढवण्यात आला आहे. यात मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजीचे प्रशिक्षक भरत अरूण, फलंदाजीचे प्रशिक्षक संजय बांगर आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांचा समावेश आहे.

वाचा-शेवटच्या सामन्यात पंतला डच्चू तर ‘या’ खेळाडूंना मिळणार संधी, कोहलीनं दिले संकेत!

'डोंबिवलीचा सुपरमॅन' सांगा कसं चढायचं लोकलमध्ये? एकदा पाहाच हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 5, 2019 07:28 PM IST

ताज्या बातम्या