BCCIनं घेतला मोदी सरकारशी पंगा, टीम इंडियातील सदस्याला दिली माफी!

BCCIनं घेतला मोदी सरकारशी पंगा, टीम इंडियातील सदस्याला दिली माफी!

भारतीय संघाचे प्रशासकिय व्यवस्थापक सुनील सुब्रमण्यम यांच्यावर बीसीसीआयनं मायदेशी पाठवण्याची कारवाई केली होती.

  • Share this:

त्रिनिदाद, 15 ऑगस्ट : भारतीय संघानं टी-20 बरोबरच एकदिवसीय मालिकेतही वेस्ट इंडिजचा फडशा पाडला. 2-0नं एकदिवसीय मालिकेत बाजी मारत, आपणचं बेस्ट असल्याचे भारतीय संघाने सिध्द केले. मात्र, बीसीसीआयच्या अडचणी वाढण्याची शक्यता दिसत आहे. कारण भारतीय संघाचे प्रशासकिय व्यवस्थापक सुनील सुब्रमण्यम यांच्यावर कारवाई न करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारताची कसोटी मालिका बाकी आहे. याआधीच भारतीय संघाचे प्रशासकिय व्यवस्थापक सुनील सुब्रमण्यम यांना दौऱ्यावरून मायदेशी बोलवण्यात आले होते. दरम्यान, मायदेशी परतल्यानंतर त्यांना बीसीसीआयसमोर हजर राहावे लागणार होते आणि त्यांनी केलेल्या गैरवर्तणुकीबाबत स्पष्टीकरण द्यावे लागणार होते. पण आता मात्र बीसीसीआयने या निर्णयावरून यू-टर्न घेतला आहे. त्यांनी माफी मागितल्यामुळे आता त्यांना एक संधी देण्यात आली आहे. प्रशासकीय समिती आणि सुब्रमण्यम यांच्यात चर्चा झाली. त्यावेळी त्यांनी आपली चूक मान्य केली. त्यामुळे त्यांना उर्वरित विंडिज दौऱ्यात संघाबरोबर राहण्याची परवानगी देण्यात आली होती.

याआधी प्रशासकांच्या समितीमधील एक सदस्यानंसुद्धा म्हटलं होतं की, सुब्रमण्यम यांच्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलिया दौऱा तसेच वर्ल्ड कपवेळी त्यांच्या कामाबद्दल नाराजी व्यक्त कऱण्यात आली होती. आता त्यांनी वेस्ट इंडीजमधील उच्चायुक्तांशी गैरवर्तन केल्याचं आढळून आलं आहे. या प्रकरणी बीसीसीआयकडून सुब्रमण्यम यांना इशारा देण्यात आला होता.

वाचा-‘या’ क्रिकेटपटूच्या घरात आहे स्ट्रिप क्लब, पाहतो बिकिनी गर्ल्सचा पोल डान्स!

दरम्यान भारतीय विदेश सेवाचे वरिष्ठ अधिकारी यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत, “भारत सरकारतर्फे पाणी बचतीसाठी विराट कोहली आणि रोहित शर्माला जाहिरात करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. यासाठी सुब्रमण्यम या सगळ्या गोष्टींची देखरेख करणार होते. दरम्यान या जाहिरातीचे शुटिंग संपल्यानंतर सुब्रमण्यम यांना उच्चायुक्तांना मेल पाठवण्यास सांगितले होते. मात्र, आता उच्चायुक्तांनी सुब्रमण्यम यांना मायदेशी बोलवले आहे”, असे सांगितले.

वाचा-IPLचा चॅम्पियन खेळाडू आता होणार शाहरूखच्या संघाचा नवा कोच!

वर्ल्ड कप दरम्यानही केलं होतं गैरवर्तणुक

वर्ल्ड कपनंतरही बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने व्यवस्थापक सुनील सुब्रमण्यम यांना फैलावर घेतलं होतं. व्यवस्थापकांनी खेळाडू नियमाचे उल्लंघन करत असताना सुब्रमण्यम यांनी आक्षेप का घेतला नाही? त्यांना फक्त संघाच्या सरावाकडे लक्ष देण्यासाठी पाठवलं नव्हतं, असे सांगण्यात आले होते.

वाचा-कर्नल महेंद्रसिंग धोनी सियाचीनमध्ये घेणार खडतर ट्रेनिंग, 'हे' आहे कारण

VIDEO : रक्षाबंधनाच्या दिवशी महिला पोलिसाचीच छेडछाड, कपडे फाटेपर्यंत रोडिरोमिओला धुतला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: BCCI
First Published: Aug 15, 2019 07:56 PM IST

ताज्या बातम्या